नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा यांचा अनागोंदी कारभार – आजचा महाराष्ट्र

सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा यांचा अनागोंदी कारभार

प्रतिनीधी संतोष जाधव

नवी मुंबई:-सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा यांचे कार्यालय सानपाडा येथील सुरक्षा रक्षकांना कामगार खात्याने वार्‍यावर सोडून दिले आहे. असे माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष श्री. गंगाधर शिवाजी वाघमारे, कार्याध्यक्ष. श्री. अभिलाष उल्हास डावरे, उपाध्यक्ष, श्री. दिपक मानकर, सह. सचिव श्री. अशोक सपकाळ, कोषाध्यक्ष श्री. मारुती झाडे यांनी न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी श्री. संतोष जाधव यांच्याशी झालेल्या मुलाखतीत म्हटले आहे. माय बळीराजा सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक संघटनेचे कार्याध्यक्ष. अभिलाष डावरे यांनी सांगितले की, मंत्रालय येथे कामगार मंत्री श्री. हसन मुश्रीफ साहेबांच्या सोबत अनेक संघटनांचे पदाधिकारी , कामगार आयुक्त,कामगार विभागाचे अधिकारी यांच्या समक्ष बैठक आयोजित करून महत्वाच्या विषयावर वाटाघाटी केल्या गेल्या त्यात एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला होता तो म्हणजे मुंबई मंडळातील सुरक्षा रक्षकांची रखडलेली वेतन वाढ एक महिन्यात देण्यात येईल असे आश्वासनही कामगार मंत्री महोदयांनी दिले. परंतु या गोष्टीला आता अनेक महिने उलटले तरी वेतन वाढ तर झालीच नाही. परंतु एक खर्चिक बाब चालू करून मंडळातल्या सुरक्षा रक्षकांना ट्रेनिंग सेंटर उघडून दिले आहे. त्याचे टेंडर खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. याचा अर्थ काय की मंडळाचा पैसा व्यर्थ वाया घालवणार का? सर्वात महत्वाचे म्हणजे आजच्या घडीला महागाईच्या दृष्टिकोनातून सुरक्षा रक्षकांची वेतन वाढ होणे आवश्यक होते. परंतु असे न करता सुरक्षा रक्षकांना ट्रेनिंग सेंटर उघडून दिले वास्तविक पाहता दोन्ही निर्णय मंत्रालयातील सदर बैठकीत घेण्यात आले होते .मग वेतन वाढ हा मुद्दा का पारित केला गेला नाही. खर्चिक गोष्टी कोणाच्या अधिपत्याखाली पार पाडल्या जातात तसेच आजवर आमच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत. असे अनेक प्रश्न डावरे यांनी उपस्थित केले आहेत. तरी लवकरात लवकर जर वेतन वाढ करण्यात आली नाही व इतरही प्रश्न मार्गी लावले नाहीत तर येत्या काळात सुरक्षा रक्षकांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असेही सूतोवाच केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]