चोरटी नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांत व विद्यार्थ्यांमधे भीती पसरली

रत्नागिरी / खेड:- मुसळधार पाऊस पडत असल्याने खवटी व दिवाणखवटी या दोन गावामधून वाहणार्या चोरटी नदीला पूर आला आहे. या दोन गावांना जोडणारा पूल छोटा असल्याने पुलावरुन

पाणी वाहते. दिवाणखवटी व वावे येथून विद्यार्थी खवटी हायस्कूलला येत असतात. या विद्यार्थ्यांचे पुरामुळे अतिशय हाल होते . अक्षरशः जीव मुठीत घेऊन पुलावरुन जावे लागते. आजारी माणसांंचेही खूप हाल होतात. तसेच या पुराचे पाणी वाडीवस्तीतही शिरते. त्याामुळे 
शेतीचे व आर्थिक नुकसानही भरपूर होते. रात्रीची वेळ असेल तर डोळ्यात तेल घालून बसावे लागते. तरी उंच पुल व्हावा व वस्तीच्या ठिकाणी संरक्षण भिंत घालावी अशी परिसरातील जनते कडून मागणी केली जात आहे. तरी याबाबत स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अन्यथा कोणतीही आकस्मिक घटना घडली तर त्याला सर्वस्वी स्थानिक प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल असे येथील ज्येष्ठ समाजसेवक नागरिक यांचे म्हणणे आहे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













