कु. तेजा सकपाळ हिचा पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे यांच्या हस्ते गुणवंत खेळाडू म्हणून सन्मान:

प्रतिनीधी रायगड/उरण :- शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे दिला जाणारा सन 2022 चा गुणवंत खेळाडू (महिला) पुरस्कार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या क्रीडा, माहिती व जनसंपर्क, उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, विधी व न्याय राज्यमंत्री कु. आदितीताई तटकरे याच्या हस्ते पुरस्कार पोलीस परेड मैदानावर कु. तेजा सकपाळ हिला प्रदान करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अशोक दुधे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक, तालुका क्रीडा अधिकारी श्री. वांजळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. सूर्यकांत ठाकूर, विविध विभागांचे अधिकारी आणि क्रीडा प्रेमी नागरीक, महिला कबड्डी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कु. तेजा हिने स्थानिक संघात खेळतांना संघाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले,जिल्ह्यात संघाला विविध ठिकाणी अजिंक्यपद मिळवून दिले,2019 मधे अखिल एकेफाय कबड्डी 
स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व, काशी वाराणसी येथे झालेल्या अखिल भारतीय युनिव्हर्सिटी स्पर्धेत मुंबई युनिव्हर्सिटी संघाचे प्रतिनिधित्व, अश्वमेध, खेलो इंडिया स्पर्धेत प्रतिनिधित्व, वेस्ट झोन युनिव्हर्सिटी स्पर्धेत ऊत्तम खेळाचे प्रदर्शन, सध्या स्थानिक संघाला ऊत्तम प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त खेळाडू घडविण्याचा काम करत आहे. हे करत असतांना तेजा म्हणाली मी जी इथपर्यंत पोहोचली याचे सर्व श्रेय मी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सुर्यकांत ठाकूर यांना देते. महारष्ट्र राज्य कबड्डी असोसिशनचे सहकार्यवाह अॅड. अस्वादजी पाटील व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह जे. जे. पाटील सर यांनी देखील शुभेच्छा देऊन तिचे कौतुक केले. कु. तेजा हिला मिळालेल्या पुरस्काराबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













