ट्रान्सफार्मर चोरीला; पालघरमधील आदिवासी पाडे ३ दिवसांपासून अंधारात
पालघर प्रतिनिधी : विक्रमगड तालुक्यातील शेवते भडांगेपाडा व ठाकूर पाड्याला वीज पुरवठा करणारा गावाबाहेर बसवलेला ट्रान्सफार्मर 13 जुलै रोजी रात्री अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याने हे पाडे 3 दिवसा पासून अंधारात आहेत. शेवते भडांगेपाडा व ठाकूर पाड्याला विज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफार्मरवर अज्ञात चोरांनी मुसळधार पावसाचा व अंधाराचा फायदा घेत डल्ला मारला आहे.
भडांगेपाडा व ठाकूर पाड्यात 70 ते 75 घरे आहेत. या घरात गेल्या 3 दिवसापासुन विज पुरवठा खंडित झाला आहे.या बाबत महावितरण पालघर कार्यालयात गावकरी तक्रार घेऊन गेले असता महावितरणच्या विक्रमगड कार्यालयाकडून विक्रमगड पोलीस ठाण्यात ट्रान्सफार्मर चोरीची तक्रार दाखल केल्या नंतर ट्रान्सफार्मर मिळेल असे सांगण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तर तालुक्यात काही दिवसापासुन मोठया प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यात गेल्या 3 दिवसापासुन विज नसल्याने या पाड्यातील ग्रासम्थांचे हाल होत आहेत. या बाबत या गावातील लोकांनी महावितरण कडे तक्रार केली आहे. महावितरणने तातडीने ट्रांन्सफार्मर बसवून दयावा अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













