नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , धम्म, पर्यावरण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत अर्जुनली येथे वर्षावासाचे भव्य उद्घाटन संपन्न – आजचा महाराष्ट्र

धम्म, पर्यावरण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत अर्जुनली येथे वर्षावासाचे भव्य उद्घाटन संपन्न

प्रतिनिधी

पिंपळ वृक्षारोपणाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश; भिवंडी तालुक्यासह विविध गावांतील शेकडो बौद्ध उपासक-उपासिकांची उत्स्फूर्त उपस्थिती

भिवंडी, :- (आ.मा.टॉ.टे.न्यू) दि. २ ऑगस्ट : भारतीय बौद्ध महासभा, भिवंडी तालुका शाखेच्या वतीने अर्जुनली येथील बुद्ध विहारात आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास उद्घाटन सोहळ्याला धम्म, पर्यावरण आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संगम लाभला. श्रद्धा, उत्साह आणि धम्ममय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास भिवंडी तालुक्यासह विविध गावांतील शेकडो बौद्ध उपासक-उपासिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. संजीव जाधव होते, तर भारतीय बौद्ध महासभा, ठाणे जिल्हा प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष संतोष जानू चव्हाण यांच्या हस्ते वर्षावासाचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटनप्रसंगी

बोलताना संतोष जानू चव्हाण म्हणाले, “वर्षावास ही केवळ धार्मिक परंपरा नसून आत्मपरीक्षण, नैतिक जीवन, समाजप्रबोधन आणि बुद्धांच्या समतामूलक विचारांना कृतीत उतरविण्याची प्रेरणादायी चळवळ आहे. भगवान बुद्धांचा धम्म हा मानवतेचा धम्म असून आजच्या समाजाला शांतता, समता आणि बंधुभावाची नितांत गरज आहे.”कार्यक्रमाचे प्रमुख प्रवचनकार भारतीय बौद्ध महासभा, ठाणे जिल्हा प्रचार व पर्यटन विभागाचे सचिव ॲड. आर. ई. कांबळे यांनी वर्षावासाचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व प्रभावीपणे

विशद केले. त्यांनी धम्माच्या आचरणातून समाजात विवेक, करुणा आणि नैतिकता रुजविण्याचे आवाहन केले.वर्षावासाच्या पवित्र औचित्याचे स्मरण ठेवत मान्यवरांच्या हस्ते पवित्र पिंपळ वृक्षाची लागवड करण्यात आली. भगवान बुद्धांना बोध प्राप्त झालेल्या पिंपळ वृक्षाच्या लागवडीद्वारे धम्म आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करून या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले.यावेळी भारतीय बौद्ध महासभा,

ठाणे जिल्ह्याच्या संरक्षण सचिव सुशीलाताई गायकवाड, केंद्रीय शिक्षक दिलीप जाधव, केंद्रीय शिक्षिका सरिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.तसेच भाईदास जाधव, डी. एच. गायकवाड, प्रमोद गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा भिवंडी तालुका अध्यक्ष ॲड. राजेश जाधव, माजी अध्यक्ष रोहित जाधव, धम्मप्रचारक विनायक जाधव गुरुजी, संजय जाधव गुरुजी, बौद्धाचार्य योगेश मोहिते गुरुजी, माजी उपाध्यक्ष (प्रचार व पर्यटन) तसेच तालुका कार्यकारिणीचे किशोर गायकवाड, संजय गायकवाड, धार्मिक गायकवाड, कैलास चव्हाण, भीमराव मुंडे, आदर्श गायकवाड, सुमित जाधव, भीमराज गायकवाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा, भिवंडी तालुका महिला कार्यकारिणीच्या अश्विनी चन्ने, बारकुबाई गायकवाड, रेणुका पवार, रजनी गायकवाड यांच्यासह टेंभवली, वांद्रे, आन्हे, कासणे शाखा तसेच पडघा विभागातील धम्मबंधू-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आन्हे गावातील ज्येष्ठ समाजसेवक श्रीधर जाधव यांचीही विशेष उपस्थिती लाभली.याशिवाय पडघा, वेहेळे, पारिवली, कासणे, आन्हे, वांद्रे, टेंभवली, अंबाडी, चिंबीपाडा, कांबे, महापोली, नांदीठणे, आवळे तसेच अर्जुनली परिसरातील शेकडो बौद्ध उपासक-उपासिका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण बुद्ध विहार परिसर धम्ममय वातावरणाने भारावून गेला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभा, अर्जुनली ग्राम शाखा, पंचशील नगर अर्जुनली येथील सर्व ग्रामस्थ, महिला, भिवंडी तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष

परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षक दिलीप जाधव गुरुजी यांनी केले, तर योगेश मोहिते गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार मानले.धम्मप्रबोधन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा अर्जुनली येथील वर्षावास उद्घाटन सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. विविध गावांतील धम्मबंधू-भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा भिवंडी तालुक्यातील धम्मचळवळीच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]