नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भिवंडीतील नारपोली येथील धोकादायक इमारतीचा भाग कोसळून ९ जणांचा मृत्यू; विनापरवानगी दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचे आदेश! – आजचा महाराष्ट्र

भिवंडीतील नारपोली येथील धोकादायक इमारतीचा भाग कोसळून ९ जणांचा मृत्यू; विनापरवानगी दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईचे आदेश!

प्रतिनिधी

भिवंडी :- आ.मा.टॉप.टेन.न्यू दि. ३१ (आ. मा. टॉ. टे. न्यू) :भिवंडीतील नारपोली-२ परिसरातील गंगारामवाडी येथील आरसीसी तळ अधिक चार मजली धोकादायक इमारतीचा मागील भाग गुरुवारी (दि. ३०) रात्री सुमारे ११.२० वाजता अंशतः कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्व. इंदिरा

गांधी उपजिल्हा रुग्णालय, भिवंडी येथे उपचार सुरू आहेत.दुर्घटनेनंतर भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर मध्यरात्री १२.२० वाजता एनडीआरएफचे पथक आणि पहाटे १ वाजता टीडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होऊन शोध व बचावकार्य राबविण्यात आले.महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इमारत प्रथमदर्शनी धोकादायक असल्याचे आढळल्यानंतर ७ सप्टेंबर २०२० रोजी इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर २२ एप्रिल २०२२ रोजी स्मरणपत्रही देण्यात आले. मात्र मालमत्ता धारकांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने ५ जून २०२६ रोजी इमारत निर्मनुष्य करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर महापालिकेने इमारतीचा पाणी व वीजपुरवठा खंडित करून तेथील कुटुंबांचे स्थलांतर केले होते.दरम्यान, मालमत्ता धारकांनी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे इमारतीची दुरुस्ती सुरू केल्याचे निदर्शनास आले. ३० जुलै रोजी सहाय्यक आयुक्तांनी घटनास्थळी पाहणी केली असता इमारतीची रचना अस्थिर झाल्याचे स्पष्ट झाले. यावेळी महापालिकेच्या पथकाने दुरुस्तीचे काम करणारे मजूर तसेच ११ कुटुंबांतील सुमारे ३५ ते ४० रहिवाशांना तातडीने बाहेर काढले. दुरुस्तीचे काम तात्काळ बंद करण्याच्या सूचना देऊनही कंत्राटदाराने त्या पाळल्या नाहीत, तसेच काही रहिवाशांनीही बाहेर पडण्यास नकार दिला. याच दरम्यान इमारतीचा मागील भाग कोसळल्याने ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेत शमीम शेख (४८), रणजीत सिंग (३२), मिराज रसूल शेख (३४), संतोषकुमार पांडे (४२), शमीम अन्सारी (३०) यांच्यासह चार अनोळखी व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृत अनोळखींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.तर अभय कुमार (२४), दीपककुमार यादव (२५) आणि संगीता प्रजापती (३६) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, महापालिकेच्या स्पष्ट सूचनांकडे दुर्लक्ष करून विनापरवानगी दुरुस्तीचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याची माहिती माहिती व जनसंपर्क विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]