नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कुर्डूस प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा – आजचा महाराष्ट्र

कुर्डूस प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा

प्रतिनिधी

रायगड (कुर्डूस ) :- रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्डूस, येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम दिनांक१५जुन रोजी साजरा करण्यात आला.या वेळी इयत्ता पहिली मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत मिरवणूक काढून, फुलांच्या वर्षावात, गुलाब पुष्प , चाँकलेट, बिस्कीट पुडा देऊन, प्रवेशद्वारावर आरती ओवाळून करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्व पालक , तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. तुषार अनंत शेरमकर, माजी सरपंच श्री. राम कर्वे , माजी सरपंच श्री. अमृत पाटील,सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील पिंगळे , श्री. कांचन केणी , श्री. प्रवीण ठाकूर, माजी मुख्याध्यापिका श्रीमती. लिला पिंगळे अंगणवाडी सेविका सौ. विशाखा धर्णे , श्रीमती. रंजना पिंगळे , सौ. हेमलता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून रायगड भुषण प्रा. डाँ.श्री. जयपाल पाटील सर अदिवासी सेवक, डाँ. बाबासाहेब समाजभूषण पुरस्कारार्थी, आपत्ती सुरक्षा विषय तज्ञ, साहित्यिक, जेष्ठ पत्रकार यांची अद्भुत उपस्थिती लाभून सरांनी पालकांना सांगितले की मुलांचा स्वच्छतेवर जास्त लक्ष ठेवणे, आपल्या गावात शेजारी असलेल्या सांबरी गावातील वात्सल्य वृद्धाश्रमाचे मालक प्राध्या. संतोष पाटील यांच्याकडे अतिशय महागडे अल्कलाइन पाणी असुन त्याचा वापर लहान मुलांसाठी खास करावा आणि ते मोफत देत आहेत, यावेळी हाताला सलाईन लावलेली मुलगी दवाखान्यात जाण्याअगोदर शाळे मध्ये प्रवेशास आली होती, तिची आणि तिच्या आई-वडिलांचे यावेळी अभिनंदन केले. त्याचबरोबर शिक्षक वृंदांचे अभिनंदन केले. आणी सर्वांना अनमोल मार्गदर्शन केले.सर्व आदरणीयांचे गुलाब पुष्प देऊन शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख सांबरी श्री. उदय अनंत शेरमकर यांनी स्वागत केले.यावेळी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मेळावा नुसार विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून आलेले मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत शुज इत्यादींचे वाटप करण्यात आले.सर्व मान्यवरांनी सर्व विद्यार्थी व पालक वर्गाला शैक्षणिक मार्गदर्शन करून या सन् : 2026/27 च्या शैक्षणिक वर्षाला शुभेच्छा दिल्या.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. निता ठाकूर व शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. राजश्री ठाकूर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]