नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री महागणपती मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त कैलासनगर- वळपाडा येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन! – आजचा महाराष्ट्र

श्री महागणपती मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त कैलासनगर- वळपाडा येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

प्रतिनिधी

ठाणे ( भिवंडी ) :- (आ. मा. टॉ. टे. न्यु.) भिवंडी तालुक्यातील कैलासनगर- वळपाडा येथे श्री महागणपती मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा शनिवार, २ मे २०२६ ते रविवार, ३ मे २०२६ या कालावधीत भक्तिभावाने साजरा होणार आहे.श्री महागणपती मंदिर, कैलासनगर – वळपाडा येथे होणाऱ्या या कार्यक्रमात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजता ह.भ.प. भारतीताई धसाडे (मु. ढाकणे, कसारा) यांचे कीर्तन होणार आहे.तसेच रविवार, ३ मे २०२६ रोजी सकाळी १० ते १२ वाजता भागवताचार्य ह.भ.प. महेश महाराज सांळुखे (मु. पाटणोली, पनवेल) यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.या हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या माध्यमातून परिसरातील भाविकांना अध्यात्मिक वातावरणाचा लाभ घेण्याची संधी मिळणार असून, ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कमिटी वळ/ वळपाडा, मरूआई महिला मंडळ, बचत गट तसेच समस्त ग्रामस्थ मंडळ, कैलासनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील समस्त वारकरी संप्रदाय व सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]