नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भिवंडीतील ‘पीस पार्क’चा रजत जयंती महोत्सव उत्साहात संपन्न – आजचा महाराष्ट्र

भिवंडीतील ‘पीस पार्क’चा रजत जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

प्रतिनिधी

एक हजारांहून अधिक ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारींची उपस्थिती

ठाणे ( भिवंडी) :-  आ.मा.टॉ.टे.न्यू प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, भिवंडी सेंटरतर्फे महानगरपालिकेकडून दत्तक घेतलेल्या ‘पीस पार्क’ उद्यानाचा रजत जयंती महोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या २५ वर्षांपासून या उद्यानामार्फत समाजात शांतता, सद्भावना आणि आध्यात्मिकतेचा संदेश दिला जात असून, या सेवाकार्याच्या गौरवपूर्ण प्रवासानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारीज संस्थेच्या संयुक्त मुख्य प्रशासिका आदरणीय संतोष दीदी जी उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून भिवंडीचे महापौर नारायणजी चौधरी, माजी आयुक्त आर. डी. शिंदे जी, उपमहापौर तारीख मोमीन जी , तसेच ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी जी,निलेशजी चौधरी,कमलाकर पाटील जी, महेंद्र गायकवाड जी, मोहन कोंडाजी, राजेश शेट्टीजी नगरसेवक व श्रीनिवास वल्ललजी, राजू गाजेंगी जी ,डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील संपादक-दैनिक स्वराज्य तोरण, समाज सेविका स्वाती कांबळे व आदी मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. भ्राता गोपाल सिंग भाई , रमण पंडीत, निलम तिवारी,सारखे पत्रकार देखील उपस्थित होते.कार्यक्रमात ‘पीस पार्क’च्या २५ वर्षांच्या सेवायात्रेचा आढावा घेण्यात आला. उद्यानाच्या माध्यमातून नागरिकांना निसर्गसंपन्न वातावरणात मानसिक शांती, योग, ध्यान आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा लाभ मिळत असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.यावेळी वृक्षारोपण, दीपप्रज्वलन, सांस्कृतिक सादरीकरण तसेच ब्रह्माभोजनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात एक हजारांहून अधिक ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारी, स्थानिक नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.भिवंडी शहरात सामाजिक, आध्यात्मिक व पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात ‘पीस पार्क’चे योगदान उल्लेखनीय असून, पुढील काळातही अशाच सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश दिला जाईल, असा संकल्प यावेळी बी के शिल्पा दीदी यांनी व्यक्त करण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]