नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संघर्षातून साकारलेले स्वप्न आणि वाढदिवसाचा प्रेरणादायी अर्थ – आजचा महाराष्ट्र

संघर्षातून साकारलेले स्वप्न आणि वाढदिवसाचा प्रेरणादायी अर्थ

प्रतिनिधी

नागपुर ( वर्धा ) :- आ.मा.टॉ.टे.न्यू एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस हा केवळ वय वाढल्याचा दिवस नसतो, तर तो आयुष्यातील संघर्ष, यश, अपयश, अनुभव आणि जिद्दीचा उत्सव असतो. आशीष मारोतराव घुमे यांचा वाढदिवसही याच अर्थाने विशेष ठरतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेचा जो ध्यास घेतला, तो प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची प्रक्रिया नसून ती समाजाचा आरसा असते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, दुर्बलांना न्याय मिळवून देणे आणि सत्य जनतेसमोर मांडणे हे पत्रकारितेचे

खरे ध्येय आहे. हाच ध्यास मनात बाळगून आशीष यांनी आपल्या वाटचालीला सुरुवात केली. सुरुवातीला पोर्टल, नंतर साप्ताहिक सुरू करून त्यांनी आपल्या स्वप्नांना वास्तवात उतरवले.काम करताना अनेक अडचणी आल्या. आर्थिक अडचणी, स्पर्धा, समाजातील दबाव या सगळ्यांशी सामना करत त्यांनी आपला मार्ग तयार केला. “आपलं स्वतःचं एक हक्काचं वर्तमानपत्र असावं” ही भावना त्यांच्या मनात दृढ झाली आणि त्यातूनच ‘सह्याद्रीचा राखणदार’चा जन्म झाला. आज हे दैनिक केवळ एक वृत्तपत्र नसून अनेकांच्या आशा-आकांक्षांचे व्यासपीठ बनले आहे.या दैनिकाच्या माध्यमातून अनेक कर्तबगार व्यक्तिमत्त्वांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवले गेले. विशेष पुरवण्या, सामाजिक विषयांवरील लेख आणि सत्याधारित बातम्या यामुळे हे दैनिक वाचकांच्या मनात घर निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. यशाच्या या प्रवासात त्यांनी केवळ स्वतःचीच प्रगती केली नाही, तर नवीन वार्ताहर आणि लेखक घडवण्याचेही मोठे काम केले. अनेक नवोदित तरुणांना संधी देत त्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्या पिढीला दिशा मिळाली. दैनिक चालवणे हे सोपे काम नाही. प्रस्थापित दैनिकांच्या स्पर्धेत टिकून राहणे, आर्थिक भार सहन करणे आणि तरीही गुणवत्ता टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान असते. मात्र आशीष यांनी पदरमोड करून, प्रचंड मेहनत घेत हे दैनिक जिवंत ठेवले. आज हे दैनिक ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून यशस्वीपणे चालत आहे.या प्रवासात त्यांच्या आयुष्यात एक मोठा वळण आले, जीवघेणा आजार जडला. अनेक ठिकाणी उपचार करूनही निराशा पदरी पडली. डॉक्टरांनीही आशा सोडली होती. पण म्हणतात ना, “जिथे इच्छा तिथे मार्ग.” त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि अथक प्रयत्नांनी त्यांनी मृत्यूच्या दारातून परत येत नवजीवन मिळवले. हे केवळ वैद्यकीय चमत्कार नव्हे, तर त्यांच्या जिद्दीचे आणि सकारात्मकतेचे फळ होते. आज त्यांचे वडील मारोतराव नारायणराव घुमे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सह्याद्रीचा राखणदार’ची घोडदौड सुरू आहे. मुद्रित माध्यम क्षेत्रात त्यांनी आपली एक ठोस प्रतिमा निर्माण केली आहे. समाजहितासाठी कार्य करणारे, सत्यासाठी लढणारे आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख झाली आहे.वाढदिवस हा आत्मपरीक्षणाचा दिवसही असतो. गेल्या वर्षातील अनुभवांचा आढावा घेऊन पुढील वाटचालीचे नियोजन करण्याची ही संधी असते. आशीष यांच्या बाबतीत हा दिवस त्यांच्या संघर्षमय प्रवासाची आठवण करून देणारा आणि पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा देणारा आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! ‘सह्याद्रीचा राखणदार’ हे दैनिक दिवसेंदिवस भरभराटीला जावो, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचो आणि समाजासाठी एक मजबूत आवाज बनो, हीच अपेक्षा. तसेच आशीष यांना निरोगी, निरामय आणि दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या कार्याला अधिक उंची मिळो हीच मनःपूर्वक शुभेच्छा.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]