नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराजस्व अभियान’ कल्याणमध्ये उत्साहात; आमदार राजेश मोरे यांनी स्वतः करून घेतली आरोग्य तपासणी – आजचा महाराष्ट्र

महाराजस्व अभियान’ कल्याणमध्ये उत्साहात; आमदार राजेश मोरे यांनी स्वतः करून घेतली आरोग्य तपासणी

प्रतिनिधी

ठाणे :- (आ.मा.टॉ.टे.न्यु.) दि.१० राज्य शासनाच्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ (समाधान शिबिर टप्पा १) अंतर्गत ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यातील ठाकुर्ली मंडळात भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला असून, लोकप्रतिनिधींनीही स्वतः सहभाग नोंदवून या उपक्रमाचे कौतुक केले.डोंबिवली (पूर्व) येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.राजेश मोरे यांनी विशेष उपस्थिती लावली. तसेच, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकारी तथा शिबिर निरीक्षक श्रीमती अंजली पवार यांच्या देखरेखीखाली शिबिराचे कामकाज पार पडले. प्रशासकीय यंत्रणा आणि जनता यांच्यातील दुवा साधण्याच्या उद्देशाने हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले.या समाधान शिबिरात नागरिकांना विविध दाखले आणि सेवा मिळण्यासाठी महसूल व भूमी अभिलेख विभाग, कल्याण -डोंबिवली महानगरपालिका (KDMC), पंचायत समिती व कृषी विभाग, कामगार आणि पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना (शहरी/ग्रामीण) या विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते.शिबिराचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे आमदार राजेश मोरे यांनी दाखवलेला प्रत्यक्ष सहभाग. त्यांनी स्वतः रांगेत उभे राहून आपले ‘आभा कार्ड’ (ABHA Card) तात्काळ तयार करून घेतले. इतकेच नव्हे तर, अभियानांतर्गत आयोजित आरोग्य शिबिरात त्यांनी आपली आरोग्य तपासणी देखील करून घेतली. “प्रशासन जेव्हा जनतेच्या दारी येते, तेव्हा योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होते,” अशा शब्दांत त्यांनी समाधान व्यक्त केले.ठाकुर्ली-डोंबिवली परिसरातील तसेच कल्याण तालुक्यातील अनेक गरजूंना या शिबिरात विविध योजनांचे लाभ प्रदान करण्यात आले. दाखले मिळण्यातील अडचणी दूर झाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. पुढील शिबीर असणार १७ एप्रिल रोजी गोवली येथे.या अभियानाचा पुढील टप्पा दि.१७ एप्रिल रोजी गोवली (म्हारळ मंडळ) येथे आयोजित करण्यात येणार आहे. तरी या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन कल्याण तहसील कार्यालयामार्फत नागरिकांना करण्यात आले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]