नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अहिल्यानगरात प्रहार जनशक्ती पक्षाची राज्यस्तरीय कार्यशाळा व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न ! – आजचा महाराष्ट्र

अहिल्यानगरात प्रहार जनशक्ती पक्षाची राज्यस्तरीय कार्यशाळा व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !

प्रतिनिधी

अहिल्यानगर :- (आ.मा.टॉ.टे.न्यू ) प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दोन दिवसीय कार्यशाळा २९ व ३० मार्च २०२६ रोजी प्रहार करिअर अकॅडमी, संभाजीनगर रोड, इमामपूर येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत राज्यभरातील अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी

नोंदणी, उद्घाटन समारंभ आणि संघटन बांधणी, शिस्त व नियोजन यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी व्याख्याते म्हणून मा. विकास लवांडे यांनी संघटन मजबुतीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच माहिती अधिकार अधिनियम २००५, सेवा हक्क अधिनियम २०१५ आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांबाबत मा. प्रल्हाद कचरे यांनी मार्गदर्शन केले.यानंतर प्रकट मुलाखतीत प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांनी पक्षाची आतापर्यंतची वाटचाल व भविष्यातील दिशा यावर भाष्य केले.कार्यकर्त्यांच्या मानसिक क्षमतेवर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी मार्गदर्शन केले. सोशल मीडिया व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता व सायबर सुरक्षा यावर मा. व्यंकटेश कल्याणकर यांनी मार्गदर्शन केले.दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांच्या व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुण व प्रशासकीय संवाद कौशल्य यावर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रकट मुलाखतीत मा. बच्चुभाऊ कडू यांच्याशी राज्यातील शेतकरी प्रश्न व नेतृत्व या विषयावर चर्चा झाली. तसेच प्रहार करिअर अकॅडमीच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी पुरस्कार वितरण व समारोप थाटामाटात समारंभ पार पडला.या कार्येक्रमात महाराष्ट्र राज्याच्या काना कोपऱ्यातून हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या राज्यस्तरीय मेळाव्यात ठाणे व पालघर जिल्हा संपर्क प्रमुख मा.श्री स्वप्नील पाटील,साहेब हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात भिवंडी ग्रामीण मधून चेतन शेलार तसेच साईनाथ पाटील व प्रहार जनशक्ती पक्षाचे भिवंडी शहर अध्यक्ष श्री भरत भोईर यांना सुद्धा सन्मानीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते राज्यस्तरीय कार्येकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळकटी, कायदेविषयक ज्ञान आणि नेतृत्व कौशल्य विकसित करण्यास मोठी मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]