नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय माणगावला २२०० इंजेक्शन सिरिंजची मोलाची भेट – आजचा महाराष्ट्र

वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय माणगावला २२०० इंजेक्शन सिरिंजची मोलाची भेट

प्रतिनिधी दिलीप करकरे

रायगड ( माणगाव ) :-आ.म.टॅा.टे.न्यू  समाजोपयोगी विचार आणि रुग्णसेवेची जाणीव जपत श्री. मंगेशी बाबुराव बुटे सर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे एकूण २२००  इंजेक्शन सिरिंज भेट देत सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.
कर्तव्यदक्ष अधीक्षक सौ. अरुणा पोहरे मॅडम यांच्या मागणीनुसार श्री. बुटे सर यांनी रुग्णालयासाठी अशा एकूण 2200 इंजेक्शन सिरिंज वाढदिवसानिमित्त भेट दिल्या. रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने येणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी अशा वैद्यकीय साहित्याची नितांत गरज असते. त्यामुळे श्री. बुटे सर यांची ही भेट रुग्णसेवेसाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे.आज अनेक जण वाढदिवस साजरा करताना विविध प्रकारचे खर्च करतात; मात्र समाजहित, आरोग्यसेवा आणि सेवाभाव यांचा विचार करून रुग्णालयाला आवश्यक साहित्य भेट देणे ही खऱ्या अर्थाने अनुकरणीय बाब आहे. श्री. मंगेशी बाबुराव बुटे सर यांनी आपल्या कृतीतून “वाढदिवस हा केवळ आनंदाचा दिवस नसून समाजाला काहीतरी परत देण्याची संधी आहे,” हा सुंदर संदेश दिला आहे.या प्रसंगी आदरणीय श्री. संतोषजी खाडे सर यांनीही अत्यंत महत्त्वाचे आणि समाजाभिमुख असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, उपजिल्हा रुग्णालयात लागणाऱ्या औषधांसाठी व आवश्यक वैद्यकीय साहित्याकरिता नागरिकांनीही पुढे येणे गरजेचे आहे. समाजातील सक्षम, सुजाण आणि सेवाभावी नागरिकांनी अशा शासकीय रुग्णालयांना आवश्यक मदत केल्यास अनेक गरजू रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळू शकतील, असे त्यांनी नमूद केले.“रुग्णालय हे सर्वसामान्य जनतेसाठी आधारस्थान आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी आपण सर्वांनी सामाजिक जबाबदारी म्हणून हातभार लावणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी यावेळी नम्रपणे आवाहन केले.या उपक्रमामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला असून, वाढदिवस, स्मृतिदिन, सत्कार समारंभ किंवा इतर खास प्रसंगी समाजोपयोगी वस्तू, औषधे किंवा वैद्यकीय साहित्य भेट देण्याची चांगली परंपरा निर्माण व्हावी, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.या वेळी कर्तव्यदक्ष अधीक्षक सौ. अरुणा पोहरे मॅडम, डॉ. प्रथमेश शिंदे साहेब, डॉ. विशाल पवार साहेब, तसेच रुग्णालयातील कर्मचारी शर्मिला मॅडम, श्री. अनिल तेटगुरे, जय खाडे व रोहित खाडे बंधू उपस्थित होते. सर्वांनी श्री. बुटे सर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.श्री. मंगेशी बाबुराव बुटे सर यांची ही कृती निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून, “समाजासाठी काहीतरी करा” हा संदेश देणारी आहे. त्याचबरोबर श्री. संतोषजी खाडे सर यांनीही नागरिकांनी पुढे येऊन उपजिल्हा रुग्णालयात गरजेप्रमाणे मदत करावी, जेणेकरून गोरगरीब व गरजवंत रुग्णांना त्याचा थेट लाभ मिळेल, असे आवाहन करत दानशूर व्यक्तींनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून रुग्णसेवेसाठी योगदान द्यावे, असे मत व्यक्त केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]