कार्ला गड एकविरा आईच्या नावाने दुमदुमला जल्लोष.
प्रतिनिधी सतीश पाटील
लोणावळा :- महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कोळी, आग्री, सीकेपी, सोनार अशा विविध समाजांची कुलस्वामिनी असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा मानाचा पालखी सोहळा चैत्र शुद्ध सप्तमीला (दि.२५ ) सायंकाळी ५ .३० वाजता कार्ला गडावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आई माऊलीचा उदो उदो, आई आयलो च्या नामघोषाने अवघा कार्ला गड दुमदुमला होता.पालखी मिरवणूक सोहळा शांततेमध्ये पार पडावा याकरिता श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट,
पोलिस प्रशासन व तालुका प्रशासन यांनी उत्तम नियोजन केले होते. कडक पोलिस बंदोबस्तात पालखीचे मानकरी असलेल्या चौल, आग्राव, ठाणेकर व पेणकर यांनी पालखीला खांदा लावत विश्वस्तांच्या उपस्थितीत आई राजा उदो… उदोचा गजर केला. या वेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी व सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी गडावर तुफान गर्दी केली होती. गडावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा पार पडला.मुंबई पत्रकार : श्री. सतिश विष्णू पाटील यांचा सत्कार करण्यात आला.आई एकविरा देवी ट्रस्ट आणि(श्री.अमर पाटील) एकविरा भक्त यांचे धन्यवाद सन्मान केल्याबद्दल. अनेक पालख्या चैत्र शुध्द सप्तमीला पायी येत असतात.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













