१०१ वर्षांची कुस्ती परंपरा जपणाऱ्या अंजुर गावात रामनवमी यात्रेनिमित्त कुस्तीचा महासंग्राम उत्साहात!
प्रतिनिधी
ठाणे (अंजूर ) :- १०१ वर्षांहून अधिक जुनी कुस्तीची परंपरा लाभलेल्या अंजुर गावात रामनवमी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेला कुस्तीचा महासंग्राम शुक्रवार, दिनांक २७ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खारभूमी गाव कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ अंजुर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कुस्ती स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्क सचिव श्री. दिना सखाराम पाटील, शिवसेना सचिव श्री. दीपक पाटील, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रमोद नागरे, दीपक राऊत (जुनांदुरखी), राजा राऊत (आलीमघर), 
हनुमान पाटील (श्रीराम नगर), यशवंत पाटील (दापोडे), बाळाराम म्हात्रे (अंजुर दिवे) आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक महादेव घरत (माजी उपसभापती), सदानंद घरत (माजी सरपंच), हरेश नाईक (माजी सरपंच), उमाकांत पाटील (माजी उपसरपंच), राष्ट्रीय खेळाडू राम किसन घरत, केतन तरे (माजी उपसरपंच), किशोर मढवी (माजी उपसरपंच) यांनीही उपस्थित राहून स्पर्धेला गौरव प्राप्त करून दिला.स्पर्धेचे पंच म्हणून राष्ट्रीय पंच प्रा. श्रीराम पाटील (कोनगाव), श्री. गणेश पाटील (सापड), तसेच गावातील पंच श्रीधर पाटील व रंधवा म्हणेरा यांनी जबाबदारी पार पाडली.यावर्षीच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे स्वर्गीय हरिचंद्र म्हात्रे (कोनगाव) यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र प्रशांत हरिचंद्र म्हात्रे यांनी चांदीची गदा बक्षीस म्हणून ठेवली होती. अंतिम कुस्ती कोल्हापूर व पिंपळास येथील खेळाडूंमध्ये रंगली. या चुरशीच्या लढतीत पिंपळासच्या जय कुंदन म्हात्रे या खेळाडूंनी विजय मिळवला. विजेत्या खेळाडूला मान्यवरांच्या हस्ते रोख रुपये १२,००० आणि चांदीची गदा प्रदान करण्यात आली.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावातील तंटामुक्त अध्यक्ष केशव पाटील, उल्हास मढवी, जनार्दन म्हणेरा, सखाराम म्हणेरा, तुकाराम पाटील, जगन पाटील, सत्यवान तरे, बबल्या तरे, मुकुंद पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय खेळाडू राम घरत यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













