नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विज्ञान तांत्रिकदृष्ट्या मानवाच्या भविष्याला आकार देत आहे – डॉ. रानिया लॅम्प – आजचा महाराष्ट्र

विज्ञान तांत्रिकदृष्ट्या मानवाच्या भविष्याला आकार देत आहे – डॉ. रानिया लॅम्प

प्रतिनिधी

जल व अवकाश नंतर अग्नी या विषयावर पुढील परिषद होणार – डॉ.विजय जाधव 

ठाणे (भिवंडी) :- पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाच्या बी.एन.एन. कॉलेज, भिवंडी येथे नुकताच “SPACE: Ace, Place, Pace” या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय आंतरशाखीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी

ग्रीस सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील ग्लोबल अकॅडमीशियन डॉ. रानिया लँपौ यांनी विज्ञान आणि समाजजीवन या विषयी अनेक गोष्टींचा ऊहापोह करत, समाजाला असलेल्या स्पेसची कमी आपल्या भाषणात मांडली. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, खगाेलशास्र व भौतिकशास्त्र विज्ञान भविष्याला आकार देत आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे दळणवळण, संदेशवहन यामध्ये आमुलाग्र बदल हाेत आहेत. शक्ती सॅट उपग्रहामुळे महिला सक्षमीकरणाचे विशेष याेगदान आहे, हे स्पष्ट केले. या उपग्रहासाठी १०८ देश एकत्र येऊन काम करत असल्याची माहिती देत श्वाश्वत विकास आणि एआयच्या बुद्धीमत्तेवर चर्चा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.परिषदेत विविध विषयांवर संशोधनपर लेख सादर करण्यात आले. सुमारे ४०० पेक्षा अधिक संशोधन निबंधांची नोंदणी (registration) करण्यात आली होती. त्यापैकी एकूण ३२५ संशोधन निबंधांचे प्रत्यक्ष सादरीकरण (paper presentation) विविध तांत्रिक सत्रांमध्ये करण्यात आले. पंचमहाभूतावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचे हे दुसरे वर्ष असून, मागील वर्षी ‘जल’ तर या वर्षी ‘अवकाश'(स्पेस) आणि पुढच्या वर्षी ‘अग्नी’ विषयावर ही परिषद होणार आहे, असे संस्थाअध्यक्ष डॉ. विजय पांडुरंग जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले . शिवाय परिषदेच्या यशस्वी होण्याचे कौतुक करत, स्पेस विद्यार्थ्याच्या दृष्टीने किती महत्वाची आहे ते सांगितले. संस्था कार्याध्यक्ष. श्री. बाळकृष्ण काळे यांनीही, “मला अनेक नव्या गोष्टी या परिषदेतून शिकायला मिळाल्या”, असे प्रतिपादन केले. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. किन्नरी ठक्कर म्हणाल्या की, “वाणिज्य, व्यापार, व्यवहार यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे आमुलाग्र बदल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पेसची काय मर्यादा आहे, याचा उल्लेख अधिक केला. याव्यतिरिक्त आयसीटी भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आर.आर. देशमुख यांनी भारतीय अवकाश संशाेधनामध्ये इस्राेचे महत्व आणि त्यांनी केलेल्या चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण, त्याबरोबरच भारताने जगाला आर्यभट्टसारखे संशोधक दिले, हे त्यांच्या सिद्धांतांसहित नमूद केले. शिवाय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समाराेपात डॉ. संताेष राठोड यांनी अवकाश या शब्दाच्या विविध व्याख्या सांगून ठिकाणा नुसार त्या कशा बदलतात, आजचे जग प्रगत तंत्रज्ञानाकडे कसे वाटचाल करीत आहे, याविषयी आपले मत व्यक्त केले. सुरवातीला आयक्यूएसी समन्वयक डॉ. कुलदीप सिंह राठोड यांनी पंचमहाभूतांचे आणि स्पेस चे मानवी आयुष्यातील महत्व सांगितले तर स्वागतपर भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. शशिकांत म्हाळुंकर म्हणाले की,”‘स्पेस’ म्हणजे फक्त ‘जागा’ किंवा ‘अवकाश’ नसून या विषयाच्या वेगवेगळ्या दृष्टीकाेनातून विचारमंथन झाले, त्यामुळे नवीन संशाेधकांना आणि विद्यार्थ्यांना संशाेधन करण्यासाठी प्राेत्साहन व दिशा मिळाली. शिवाय जीवनदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशाेक वाघ आणि वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी बी.एन.एन. महाविद्यालयाच्या जडणघडणीबद्दलच्या आठवणी सांगितल्या. यावेळी संस्थेचे सरचिटणीस ॲड. राेहित जाधव, सदस्य श्री. अशाेक हिवरे, साधू बेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत माळी, रॉयल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना पाटणकर-जैन, डॉ. निता खाडंपेकर, मोमिन महाविद्यालय प्राचार्य डॉ. तब्बसून शेख, दै. स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री.किशाेर बळीराम पाटील, उपप्राचार्य डॉ. सुधीर निकम, डॉ. सुरेश भदरगे, डॉ. निनाद जाधव, एम. ओ. महाले, के.पी. अहिरे, श्रीकांत पाटील, प्रबंधक नरेश शिरसाळे, पद्मश्री मुख्याध्यापक सुधीर घागस यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. निनाद जाधव लिखित ‘ग्रामीण पायाभूत सुविधा आणि विकास’ या पुस्तकाचे अनावरण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे, परिषदेचे उद्घाटन अध्यक्ष डॉ. विजय जाधव व कार्याध्यक्ष श्री. बाळकृष्ण काळे यांनी एका रोपट्याला पाणी देऊन, पर्यावरण समतोल राखण्याचा संदेश देत अनोख्या पद्धतीत केले. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. विकास उबाळे, डॉ. रमेश घोगरे आणि डॉ. सागर सानप या तीन कर्मयोगींना पीएच.डी. मार्गदर्शकपद प्राप्त झाले असून, डॉ. रसिका घरत आणि डॉ. विना धसाडे – सानप या दोन कर्मयोगींनी पीएच.डी. पदवी संपादन करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिषद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब पगारे, प्रा. प्रियंका ठाकूर, प्रा. नीलम सेन, प्रा. तंझील नाचण, प्रा. राजेश देसले यांनी केले. परिषदेच्या समारोप सत्रात मान्यवरांनी संशोधनपर उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत अशा परिषदांमुळे ज्ञानवृद्धी आणि शैक्षणिक देवाणघेवाण वाढीस लागते, असे मत व्यक्त केले. संपूर्ण परिषद शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत फलदायी ठरली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]