नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पत्रकार बांधवांना सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी हेल्मेटचे वाटप- संपादक डॉ.किशोर पाटील – आजचा महाराष्ट्र

पत्रकार बांधवांना सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी हेल्मेटचे वाटप- संपादक डॉ.किशोर पाटील

प्रतिनिधी

स्वराज्य तोरणचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

रायगड :- दैनिक स्वराज्य तोरणचा १७ वा वर्धापन दिन सोहळा संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कैलासनगर, वळपाडा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अरुण मिश्रा, फकरे आलम, आचार्य सुरजपाल यादव ,संतोष चव्हाण,डॉ.श्री.मनीलाल रतिलाल शिंपी, आसद काजमी,अब्बू बकार, राजेंद्र काबाडी, अशोक, पाटोळे, कुसुमताई देशमुख, नीलम तिवारी ,परविन खान, मंजू गुप्ता, रेश्मा अन्सारी, सोमनाथ बाळाराम ठाकरे, अफसर खान, व विविध माध्यमांतील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.जवळजवळ ६५ पत्रकारांना हेल्मेट व मिठाईचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी स्वराज्य तोरणच्या १७ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला. दैनिक स्वराज तोरणने गेल्या १७ वर्षात समाजातील वास्तव प्रश्नांना वाचा फोडत जबाबदार पत्रकारितेचा संकल्प करून लोकशाही मूल्यांचे पालन केले आहे. त्यामुळे ते अखंडितपणे सुरू आहे. याच कार्यक्रमात मराठी लाईव्ह न्युज च्या वतीने त्यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्ताने संपादक डॉ. किशोर पाटील यांना “प्रेरणा पर्व २०२५” हा पुरस्कार त्यांचे प्रतिनिधी ,डॉ.श्री.मनीलाल रतिलाल शिंपी यांनी आदरपूर्वक प्रदान केला.अध्यक्षीय भाषणात डॉ. किशोर पाटील म्हणाले, “स्वराज्य तोरण हे केवळ वृत्तपत्र नसून लोकशाही, सत्य आणि प्रामाणिकतेचा ध्यास घेणारे एक जनआंदोलन आहे. वाचकांचा विश्वास आणि पत्रकार बांधवांचे सहकार्य हेच माझे सर्वात मोठे यश आहे.” जर तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत तर कार्यक्रम यशस्वी होणार नाही, म्हणून मी वर्धापन दिनानिमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या पत्रकारांना काहीतरी देत असतो.मी कधीच पत्रकारांमध्ये भेदभाव मानत नाही कारण सर्व पत्रकार हे माझे बांधव आहेत असे मी समजतो म्हणूनच तुम्ही सर्व जाती धर्माचे पत्रकार या ठिकाणी येता. ज्याप्रमाणे राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी मदत करत असतात. त्याचप्रमाणे मीही माझ्या पत्रकारांना मदत करत असतो.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पत्रकार बांधवांना सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी हेल्मेटचे वाटप करण्यात आले. तसेच वर्धापन दिनानिमित्त दीपावली स्नेह मिलन म्हणून कीर्ती ट्रॅव्हलच्या माध्यमातून मिठाईचे वाटप करून आनंदसोहळा साजरा करण्यात आला.पत्रकारांनी मनोगत व्यक्त करताना स्वराज्य तोरणच्या प्रामाणिक आणि जनहिताभिमुख वृत्तांकनाचे कौतुक केले. “ग्रामीण भागातील प्रश्नांना दिशा देणारे हे माध्यम खऱ्या अर्थाने लोकांचे आवाज बनले आहे,” संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील हे नेहमीच पत्रकारांना मदतीचा हात पुढे करतात.पावसाला असो, उन्हाळा असो,की,हिवाळा असो अशा सर्व ऋतूंमध्ये ते पत्रकारांना रेनकोट ,हेल्मेट, मिठाई जसा देश तसा वेश या प्रकारे मदत करतात असे मत अनेक पत्रकारांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन _श्री. राजेंद्र पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अफसर खान यांनी केले. 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]