नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पोषण ट्रॅकर व घरपोच आहार ऑनलाइन नोंदणी प्रशिक्षण संपन्न – आजचा महाराष्ट्र

पोषण ट्रॅकर व घरपोच आहार ऑनलाइन नोंदणी प्रशिक्षण संपन्न

प्रतिनिधी ता सचिन पावशे

रायगड (अलिबाग ) :- रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका व अंगणवाडी सेविका यांच्यासाठी पोषण ट्रॅकर व घरपोच आहार ऑनलाइन नोंदणी बाबत विशेष प्रशिक्षण गुरुवारी (दि.१०) अलिबाग तालुक्यात आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. पोषण ट्रॅकर प्रणाली अंगणवाडीच्या कामकाजातील सर्वाधिक महत्त्वाचा विषय आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कामकाज करताना अंगणवाडी सेविकांना काही अडचणींचा सामना करवा लागतो. यामुळे दैनंदिन समस्यांचे निराकरण व इत्यंभूत मार्गदर्शन या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका व अंगणवाडी सेविका यांना देण्यात आली. तसेच लाभार्थ्यांना घरपोच आहार ऑनलाइन नोंदणी संदर्भातील ॲप बाबतही तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षण वर्गामुळे अंगणवाडी सेविका व मुख्य सेविकांना पोषण ट्रॅकर वापराबाबत येणाऱ्या बऱ्याच समस्यांचे निराकरण होऊन अंगणवाड्यांच्या कामकाजात सुलभता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी व्यक्त केला. मुख्य प्रशिक्षक म्हणून आयुक्तालयामार्फत कृष्णा कुयटे, आशिष बोरकर, शुभम यांनी प्रशिक्षण दिले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]