अंबरनाथच्या प्रशिक्षक सदाशिव बराल यांनी ‘काई वेस्टर्न इंडिया कराटे डो चॅम्पियनशिप’ मध्ये पटकाविले सुवर्णपदक
प्रतिनिधि ठाणे
मुंबई (ठाणे) :- पुणे येथे काई वेस्टर्न इंडिया कराटे डो चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धा भरविण्यात आल्यात. संपुर्ण महाराष्ट्रभरातून कराटे पटूंनी या राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एस.के.बी कराटे – डो स्केट्स अँड स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थांनी पदक पटकावले. अंबरनाथच्या सदाशिव 
बराल याने या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. हजारोंच्या संख्खेने महाराष्ट्रातील विविध जिल्हा व तालुक्यातील विद्यार्यांनी या स्पर्धेत सहभाग दर्शविला होता. स्पर्धेत काई वेस्टर्न इंडिया कराटेडो चॅम्पियनशिपकहा विजेता सदाशिव बराल याने सुवर्णपदक, आरव यादव याने रौप्य पदक, सविता चौरसिया हिने सुवर्णपदक, ओंकार दळवी याने रौप्य पदक पटकाविले आहे. एस.के.बी कराटे – डो स्केट्स अँड स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रशिक्षक तथा सुवर्णपदक विजेते सदाशिव बराल यांचा विविध पक्षाचे पदाधिकारी व खेळाडू विद्यार्थांचे कैातुक करून शूभेच्छा दिल्यात.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













