शून्यातून उभारले विश्व –संकुलचा विना प्रॉडक्ट घराघरात.
प्रतिनिधि संजीव भांबोरे
भंडारा :- पवनी तालुक्यातील मोहरी चौरास येथील युवकाची यशोगाथा…आसगाव-जवळीलच मोहरी चौरास येथील युवा उद्योजक संकुल ईश्वर शहारे ह्या युवकांने डिटर्जेंट पावडर निर्मिती करून शून्यातून विश्व निर्माण करण्याचा संकल्प घेतला व त्यात तो खरं उतरत आहे.. संकुलने २०१८ साठी विना डिटर्जेन्ट पावडर निर्मिती हाताने तयार करून थेट ग्राहकांनच्या घरापर्यंत पोहचविले त्यात त्याच्या प्रॉडक्टला चांगला प्रतिसाद मिळाला व त्याचा आत्मविश्वास जोमाने वाढला व त्याचा डिटर्जेन्ट ग्राहक वापरू लागले नन्तर 
टाळेबंदी लागली व त्याचा व्यवसाय बंद पडला त्यांनतर त्याने पुन्हा ऑगस्ट २०२० ला रामकृष्ण उद्योग ह्या नावाने मिक्सर,पॅकेजिंग मशीन आणून व्यवसाय सुरु केला डिटर्जेन्ट सोबतच त्याने कपडा आणि भांडे साबुन,भांडे धुण्याचे जेल, टाईल्स क्लीनर, फ्लोअर क्लीनर, टॉयलेट बाथरूम क्लिनर, कांच क्लीनर, कार आणि बाईक वॉशिंग शाम्पू,शेतात औषध फवारणी स्टिकर इत्यादी प्रॉडक्ट त्याने तयार केले सोबतच ब्लिचिंग पावडर ची ग्रामपंचायत ला विक्री करने सुरुवात केली..
त्याचे प्रॉडक्ट उद्योगातून थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असल्यामुळे ग्राहकांना ते कमी किमतीत दर्जेदार मिळत असल्यामुळे ग्राहकांची पसंती अधिकच वाढत आहे. गेल्या डिसेम्बर महिन्यात त्याने आसगाव येथे स्वतःच्या प्रॉडक्ट चा आउटलेट (दुकान) चालू केला त्यात ग्राहकांचा चांगला प्रतिसाथ आहे.. आणि गेल्या 1 जून पासून त्याने तालुक्यात चालता फिरता दुकान Tata Ace च्या माध्यमातून चालू केला. प्रत्येक गावात त्याचे प्रॉडक्ट विकत आहेत.येत्या काळात अंघोळीची साबुन व केस धुण्याचा शाम्पू ही उत्पादन होईल असे संकुल ने सांगितले. ह्या व्यवसाया बरोबरच त्या भूगोल विषयात M. A. पर्यंतच शिक्षण ही पूर्ण केले. आणि व्यवसाययात त्याचा घरच्या लोकांची साथ व पाच लोकांना रोजगारही मिळत आहे व्यवसातून सध्या चांगला नफा देखील मिळतो असे सांगितले.
प्रतिक्रिया :- नोकरीच्या मागे न लागता स्वतः नोकरी देण्याच्या मानसिकतेतून मी या व्यवसायाकडे पाऊल टाकले. विना डिटर्जंट इतर विना प्रॉडक्ट मार्केटमध्ये मध्ये चालत असलेल्या दर्जेदार आणि स्वस्त असल्यामुळे ग्राहकांच्या विना प्रॉडक्ट मार्केटमध्ये चालत असलेल्या टॉप ब्रँड पेक्षा दर्जेदार आणि स्वस्त असल्यामुळे ग्राहकांचा विना प्रॉडक्ट कडे कल जोमाने वाढत आहे .आपणही एकदा विना प्रॉडक्ट वापरून बघायला हरकत नाही*.
*संकेत शहारे व्यावसायिक मोहरी*
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













