खेड तालुक्यातील शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कुल ची १००% निकालाची परंपरा कायम


सोहम विनोद शिंदे याने ७८.८०% गुण मिळवून विद्यालयात आला पहिला
रत्नागिरी (खेड) :- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चोरवणे गाव खेड पासून ५५ किलोमीटर आणि चिपळूण पासुन ४० किलोमीटर आहे.चोरवणे गाव नागेश्वर देवस्थान आणि इतिहासाची पाऊलखुणा दाखवणाऱ्या वासोटा किल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे.अशा या दुर्गम भागात नागेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई
संचालित शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कुल आहे.कित्येक वर्षांपासून या विद्यालयाचा निकाल १००% लागत आहे. यावर्षी शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कुल मध्ये इयत्ता १० वी चे सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत.१००% निकाल लागण्या मागचे एकच कारण आहे येथील मार्गदर्शन करणारे शिक्षक उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत आहेत आणि विद्यार्थी ही उत्तम प्रकारे अभ्यास करून पास होत आहेत.प्रथम क्रमांक-सोहम विनोद शिंदे ७८.८०%,द्वितीय क्रमांक-समर्थ विनोद पालांडे ७८.२०%,तृतीय क्रमांक-तन्वी दिनेश जाधव ७७.००%,तृतीय क्रमांक-स्वरांजली संतोष कदम ७७.००%.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक श्री.गावडे सर, सौ.भुजबळ मॅडम,श्री.भंडारे सर, श्री.ए.जी.उतेकर सर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक देशमाने सर (इंग्रजी),कुमारी ऋतुजा खेर, सौ.खेर मॅडम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांचे चोरवणे पंचक्रोशी भागातून अभिनंदन होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space