आई सोमजाई कॅन्स्ट्रक्शण संघ ठरला अंतिम विजेता
प्रतिनीधी पांडुरंग माने
रायगड (माणगाव) :- श्री छत्रपती शंभूराजे ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन गोरेगाव लोणेरे आयोजित प्रिमिअर लीग २०२३ मोठ्या दिमाखदार उस्तवात संपन्न झाल्या दोन दिवस चाललेल्या स्पर्धेत एकूण १२ संघाचा सहभाग होता शनिवारी ६ संघ आणि रविवारी ६ 
संघ खेळविण्यात आले असोसिएशन शी सलग्न असणाऱ्या १६ संघा च्या खेळाडूंची निवड रीतसर लिलाव पद्धतीनी करण्यात आली होती आणि त्या मधून १२ संघ निवडण्यात आले होते त्या मध्ये अंतिम सामना आई सोमजाई कॅन्स्ट्रक्शण विरुद्ध अनिष्का फायटर गवळ आळी ह्या दोन संघात झाला त्या मध्ये आई सोमजाई कॅन्स्ट्रक्शण संघ अंतिम विजेता झाला त्यांना ३०००० व उत्कृष्ट चषक मिळविला उप विजेता संघाला २०००० व उत्कृष्ट चषक मिळविला तिसरा क्र १०००० एस एन कलेक्शन व चषक चतुर्थ ५०००० व चषक क्र समर्थ अंश इलेव्हन संघांनी मिळवला उत्कृष्ट फालंदाज ओमकार व गोलंदाज रोहित महाजन तसेच मालिकावीर म्हणून रोशन नेमाने यांची निवड करण्यात आली सर्व खेळाडूंला लागणारे टी शर्ट 
शिवसेना उप नेते आणि विधिमंडळ पक्ष प्रतोद आ भरतशेट गोगावले यांनी दिले होते तसेच सर्व सन्मानचिन्ह युवा उद्योजल अक्षय यादव यांनी दिले सर्व सामन्याच्या सामनावीर चषक व टीशर्ट उद्योजक निलेश केसरकर यांनी दिले होते, तसेच उद्योजक आकाश पांचाळ, यांनी मदत केली अंतिम सामन्यात प्रमुख पाहुणे म्हणून एन आर ए ग्रुप चे संस्थापक नरेशजी अहिरे, पत्रकार भारत गोरेगावकर, उद्योजक अक्षय जाधव,उप सरपंच दिनेश उचाटे, पत्रकार सिकंदर आंबोनकर, ग्रामपंचायत सदस्य दिनेश गोरीवले,अनिकेत घोसाळकर,धीरज जाधव, विनू इंगवले, प्रेम साळवी,सामने यशस्वी होण्यासाठी छत्रपती शंभूराजे ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन चे पदाधिकारी तसेच लीग पदाधिकारी यांनी फार मेहनत घेतली होती समलोचक म्हणून अल्पेश महाडिक यांनी भूमिका पार पाडली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













