नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भारत सरकारचा पुरस्कार मिळविणारे मालेवाडी गावातील प्रथम व्यक्तिमत्व पै. संदीप दळवी – आजचा महाराष्ट्र

भारत सरकारचा पुरस्कार मिळविणारे मालेवाडी गावातील प्रथम व्यक्तिमत्व पै. संदीप दळवी

प्रतिनीधी कोल्हापूर

कोल्हापूर (शाहूवाडी) :- एन आय एस कोच, मालेवाडी गावचे सुपुत्र पै. संदीप दळवी यांनी कुस्ती कोच म्हणून आपला ठसा कायम उमटविला आहे अगदी छोट्यातील छोट्या कुस्त्यां पासून ते महाराष्ट्र

केसरी मानाची स्पर्धा समजल्या जाणार्‍या स्पर्धेतही संदीप दळवी सरांची पंच म्हणून निवड झाली होती. यातही संदीप सरांनी प्रामाणिकपणे पंच म्हणून काम केल त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल वदैदीप्यमान

कामगिरीबद्दल संदीप दळवी सरांना क्रिडा मंत्रालय, भारत सरकार संलग्न कडून उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्रिडा मंत्रालयचे मान्यवर उपस्थित होते. संदीप दळवी सरांच्या बद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. मालेवाडी गावचे नाव देशात व राज्यात उंचावर नेणारे व ख्याती मिळवून देणारे प्रथम कुस्ती पटू (कोच ) आहेत. या त्यांच्या उत्तुंग कामगिरीचे श्रेय त्यांच्या आईला म्हणजेच हौसाईला त्यांनी दिले त्यांनी अतिशय

हलाखीत संदीप सरांना मोठे केले दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असताना स्वतः च्या पोटाला चिमटा घेतला. परंतु संदीप सरांना खाण्यापिण्याची कमी होऊ दिली नाही वडिलांची ही कमी जाणवू दिली नाही. पती हयात नसताना त्यांच्या पश्चात एकटीने संदीप सरांना वाघासारखे पैलवान बनवले त्या माऊलीला कदाचित माहित होते की माझा मुलगा पुढे जाऊन गावचे नाव राज्यभरात व देशभरात गाजविणार आहे. संदीप दळवी सरांनी त्यांच्या आईच्या कष्टाचे चीज केले, स्वतःचे नाव तर मोठे केलेच पण गावचेही नाव देशभरात गाजविले या निमित्ताने संदीप दळवी सरांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. संदीप दळवी सरांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी गावचे व स्वतःचे नाव उज्वल करावे या शुभेच्छा क्रिडा प्रेमी तरुणांनी संदीप सरांकडून मार्गदर्शन घेणे मोलाचे राहील तसेच संदीप सरांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती खेळात सहभागी होणे गरजेचे आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]