नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा धुमाकूळ, पोलीसांनी तातडीने कारवाई करावी : स्थानिक नागरिकांची मागणी – आजचा महाराष्ट्र

रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा धुमाकूळ, पोलीसांनी तातडीने कारवाई करावी : स्थानिक नागरिकांची मागणी

पत्रकार समीर बामुगडे

रायगड (रोहा) – बंद चक्री जुगार पोलिसांच्या वरदहस्तामुळे पुन्हा सुरू असे नागरिकांचे म्हणणे आहे. रोहा शहरात ऑनलाईन चक्री जुगाराचा मायाजाळ पसरलेला असून असून अनेक जुगारवेडे तरूण यामध्ये गुरफटत चालले आहेत. येथील बेकायदा चक्री जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील पोलीसांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या चक्री जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.

रोहा शहरातील खैरकर हॉस्पिटलच्या बाजूला व दमखाडी कोर्ट रोड तसेच चित्रकुट आणि आपणा बाजारा जवळ ऑनलाईन चक्री जुगाराचा अड्डा राजरोसपणे सुरू असून या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तातडीने सदरच्या ऑनलाईन चक्री जुगारावर कारवाईचे आदेश देऊन हा अवैध चक्री जुगार बंद करावा अशी मागणी येथील स्थानिक सोसायटीतील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]