नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दिपावलीच्या निमित्ताने खेड बाजारपेठेत गर्दी कंदील, रांगोळी आणि अन्य साहित्य उपलब्ध : कंदील, पणत्या आणि रांगोळी सह विविध सजावटीसाठीच्या साहित्यांनी सजली खेड बाजारपेठेतील दुकाने – आजचा महाराष्ट्र

दिपावलीच्या निमित्ताने खेड बाजारपेठेत गर्दी कंदील, रांगोळी आणि अन्य साहित्य उपलब्ध : कंदील, पणत्या आणि रांगोळी सह विविध सजावटीसाठीच्या साहित्यांनी सजली खेड बाजारपेठेतील दुकाने

पत्रकार राजेंद्र दळवी,

रत्नागिरी (खेड) – दिपावलीच्या निमित्ताने खेड बाजारपेठ सजलेली दिसून येत आहे. गणेशोत्सवानंतर बाजारपेठेत विशेष गर्दी दिसून येत नव्हती. परंतु दिवाळीच्या निमित्ताने का होईना खेड बाजारपेठेत खरेदीसाठी थोड्या बहुत प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. घराच्या

अंगणात विविधांगी रंगीबेरंगी रांगोळी, आकाश कंदील आणि विविध आकाराचे दिव्याची आरास करण्यासाठी शोभिवंत पणत्या अशी खरेदी तर दिवाळ सणाच्या निमित्ताने नवीन कपड्यासह गृहपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. दिपावलीच्या निमित्ताने लागणार्‍या विवीध वस्तु विक्रीसाठी खेडच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे खेडची बाजारपेठ सजावटीच्या

वस्तुंनी सजली आहे. प्लास्टिक बंदी असल्याने कागदी,क्रेपपासून बनविलेल्या विवीध प्रकारच्या फुलांच्या तोरणे, विविध लाईटींगची तोरणे उपलब्ध आहेत. लाल, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी आदी विविध रंगाच्या पणत्या तसेच तयार मेणाच्या पणत्या व विविध प्रकारचे कंदील खरेदीसाठी ग्राहकांची विशेष झुंबड उडत आहे. १०० रुपयापासून ४५० रुपयापर्यत कंदीलाचे दर सांगण्यात येत आहेत. लवंगी, स्ट्रॉबेरी, अ‍ॅपल आदी आकारातील संगीत विद्युत माळाही बाजारात उपलब्ध आहेत. २५० रुपयापासून ४००० रुपये किमतीला या माळा उपलब्ध आहेत. चायनामेड कंदीलापेक्षा स्वदेशी कंदीलाचे दर अधिक असले तरी चायनामेड कंदील खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प आहे. स्वदेशी गोष्टींच्या विविध रंगी कंदील खरेदीवरच ग्राहकांचा अधिक भर आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेली ऑनलाईन खरेदी आणि अवेळी पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे दिपावली असुन देखील बाजारात गेले आठ दिवस फारशी गर्दी दिसून येत नव्हती. परंतु गेल्या दोन दिवसापासून खरेदीसाठी बाजारात गर्दी होताना दिसून येत आहे. परंतु बाजारात सुरु असलेली व्यापारी वर्गातील स्पर्धेमुळे सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानात भरलेला माल संपवण्याचे आमच्यासमोर एक आवाहनच आहे. अशी प्रतिक्रिया खेड बाजारपेठेतील व्यापारी विक्रांत गांधी यांनी दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]