नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , १२ व १३ नोव्हेंबरला सातारा येथे निशंक भारतच्या चौथ्या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन … – आजचा महाराष्ट्र

१२ व १३ नोव्हेंबरला सातारा येथे निशंक भारतच्या चौथ्या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन …

पत्रकार राजेंद्र दळवी 

रत्नागिरी(खेड) :-देश आणि समाजासाठी समर्पित, संवेदनशील, प्रेरणादायी शिक्षक, प्रशिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली निशंक भारत ही शिक्षण, कला आणि संस्कृती जतन व संवर्धनासाठी निर्माण झालेली राष्ट्रीय पातळीवरची स्वयंसेवी संस्था आहे. महाराष्ट्र, दिल्ली, जम्मू काश्मीर, केरळ, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि अंदमान आणि निकोबार या राज्यात सध्या सक्रिय असणाऱ्या या संस्थेच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले जाते. दिल्ली, जम्मू, बिहार इथल्या आयोजनानंतर १२ व १३ नोव्हेंबर २०२२ ला महाराष्ट्राच्या सातारा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पस, वाढे, जिल्हा सातारा येथे यंदाच्या चौथ्या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निशंक भारतचे महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष विक्रम अडसूळ व सचिव उमेश देशमुख, निताली हरगुडे, राजेंद्र आंधळे आदींनी दिली.

               पर्यावरणाचा झपाट्याने सुरू असलेला ऱ्हास लक्षात घेऊन दरवर्षी एक पर्यावरण समस्या घेऊन त्यावर काम करणाऱ्या निशंक सोसायटीने यंदाच्या वर्षी देशभर ग्रीन स्कूल अर्थात हरित विद्यालय ही संकल्पना घेऊन या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या शिवाय प्लास्टिकच्या वाढत्या वापरातून उद्भवणाऱ्या समस्या, प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम, प्लास्टिक ला पर्याय या विषयीची जनजागृती या महोत्सवातून करण्याचा निर्धार केला आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी, भावी पिढीला एक सुजलाम व सुफलाम पृथ्वी पाहायला मिळण्यासाठी निशंक भारत सोसायटीचा हा प्रयत्न एका नव्या प्रेरणेने खेड्यांपासून ते शहरापर्यंत सुरू आहे. याविषयावरील विविध तज्ज्ञांची अभ्यासपूर्ण व्याख्याने, नृत्य, नाट्य, कलांचे सादरीकरण, जनजागृतीपर दिंडी असे या महोत्सवाचे स्वरूप असणार आहे. या महोत्सवासाठी राष्ट्रीय अध्यक्षा प्रा. डॉ. पवन सुधीर, राष्ट्रीय सचिव राजिंदर खजुरीया, राष्ट्रीय खजिनदार सुनील देसाई यांच्यासह भारतभरातून विविध राज्याचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

                 निशंक भारत ही संस्था कला, संस्कृती आणि शिक्षणाच्या संकल्पनेवर काम करत असतांना कलेतून, खेळातून आणि आपल्या सांस्कृतिक वारस्यातून विद्यार्थ्यांना हसतखेळत व आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. मुलांच्या सर्जनशीलतेला, सृजनशीलतेला आणि आनंददायी प्रवृत्तीला प्रोत्साहन देतांनाचा, मुलांचा शाररिक, मानसिक, भावनिक, सामाजिक विकास करून त्याला नवनवीन संधी उपलब्ध करून देतांना सुदृढ व सुजाण नागरिक घडवते.

                   ज्या विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना व पर्यावरण प्रेमी नागरिकांना स्वतःमध्ये व आपल्या परिसरात सकारात्मक व अर्थपूर्ण बदल घडवायचा आहे त्यांनी मोठ्या संख्येने निशंक सोसायटीच्या वतीने आयोजित चौथ्या राष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन निशंक भारतचे सदस्य व रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी श्री. संतोष गणपत देवघरकर, खेड यांनी यावेळी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]