जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांना केला पत्रव्यवहार

रत्नागिरी (खेड)-गणपती उत्सव दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या गाड्यांचा फायदा रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना काहीच होणार नाही तेव्हा मुंबई रत्नागिरी तसेच मुंबई चिपळूण या दोन गाड्या सोडण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि खेड रेल्वे स्थानकात अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेस सह एकूण ०९ गाड्यांना खेड स्टेशन येथे थांबा मिळवून द्यावा यासाठी *आज दिनांक १७-०८-२०२२ रोजी चर्चगेट स्टेशन येथील जनशिकायत कार्यालय रेल मंत्रालय या ठिकाणी जाऊन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे यांना जल फाउंडेशन कोकण विभाग या संस्थेच्या वतीने जल फाउंडेशन कोकण विभाग या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितिन सखाराम जाधव तसेच जल फाउंडेशन कोकण विभाग या संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सचिन काते यांच्या हस्ते आज दोन पत्र देण्यात आले* असून या पत्रांचा गांभीर्याने विचार करून आपल पत्र सबंधित अधिकाऱ्यांना आणि विभागांना पाठवले जाईल तसेच आपण दिलेल्या पत्रावर कोणत्या पद्धतीने काम सुरू आहे याची माहिती आपणास मेल वर दिली जाईल असे आश्वासन जन शिकायत कार्यालय मधील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
*रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना गणपती उत्सव दरम्यान सोडलेल्या गाड्यांचा कोणताही फायदा होणार नाही कारण या गाड्या सर्व सिंधुदुर्ग गोवा कर्नाटक या ठिकाणी सोडलेल्या असून या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्या मुळे माणगाव ते खेड पर्यंत असलेल्या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घ्यावा. तसेच दोन पॅसेंजर गाड्या खेड तालुक्यातील दिवाण खवटी स्थानकामध्ये थांबत होत्या. कोव्हिड काळात बंद असलेल्या या पॅसेंजर पूर्ववत झाल्या. पण त्यामधील दिवा सावंतवाडी पॅसेंजर मात्र या स्थानकात थांबत नसल्याने या परिसरातील अनेक गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे*.
तसेच अनेक वर्षांपासून खेड रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन अनेकदा गाड्यांना थांबा मिळाला पाहिजे यासाठी पत्रव्यवहार झालेले आहेत. यातच *जल फाउंडेशन कोकण विभाग या संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट २०१९ रोजी पहिले लाक्षणिक उपोषण खेड रेल्वे स्थानकामध्ये झालं होत. त्यांनतर काही महिन्यातच नेत्रावती एक्सप्रेसला खेड मध्ये थांबा मिळवून देण्यात यश मिळाले.पण या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता खेड रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या गाड्या अपूर्ण आहेत दुसरी गोष्ट म्हणजे बहुतेक गाड्या गोवा तसेच दक्षिण भारतातून येतात त्यामुळे खेड तालुक्यातील लोकांना या गाड्यांमध्ये बसायचं तर सोडाच पण दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करायला ही तारेवरची कसरत करावी लागते. आरक्षण असूनही गाडीत चढायला मिळाले नाही तर मग या गाड्यांचा उपयोग काय? या कारणास्तव गणपती उत्सव २०१९ च्या परतीच्या प्रवासात खेड मध्ये प्रवाश्यांनी उद्रेक केला होता. असे प्रकार अनेकदा झाले आहेत. आणि असा उद्रेक पुन्हा होऊ नये यासाठी *जनशताब्दी एक्स्प्रेस सह अजून काही गाड्यांना थांबा मिळाला पाहिजे* यासाठी आज जल फाउंडेशन कोकण विभाग या संस्थेच्या वतीने पत्र देण्यात आले आहेत.
तसेच हे पत्र कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे च्या सर्व विभागांना ईमेल द्वारे पाठवले आहेत. धन्यवाद जल फाउंडेशन कोकण विभाग रजि.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













