मांडवे ग्रामपंचायत येथे माजी सैनिकाच्या हस्ते संपन्न झाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

रत्नागिरी (खेड) :- खेड तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतमध्ये सरपंच सौ. सुनीता बाळकृष्ण कासार यांच्या संकल्पनेतून भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट रोजीचे ध्वारोहण देशसेवा करून निवृत्त झालेल्या सैनिकांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवदिनी देशाच्या सीमेवर आपली कामगिरी बजावून निवृत्त झालेल्या सैनिकांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ज्यामध्ये मराठी शाळा- श्री विजय जाधव, न्यू इंग्लिश स्कूल- मांडवे- श्री. एकनाथ शिंगरे, ग्रामपंचायत कार्यालय -श्री. धोंडू बने,उपकेंद्र मांडवे- श्री. आदावडे, वाडी जैतापूर शाळा – श्री केशव निकम, कोसमवडी शाळा – श्री.सीताराम कदम या सर्व निवृत्त सैनिकांच्या हस्ते करण्यात आले.

त्याच प्रमाणे भारतीय सैन्यातील कार्यरत सैनिक श्री.संतोष विजय जाधव यांनी आर्मीच्या गणवेशात उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.ग्रामपंचायतच्या वतीने माजी सैनिक,माजी पोलीस अधिकारी,माजी सरपंच, उत्कृष्ट कामगिरी करणारे कोविड योद्धे व गुणवंत विद्यार्थी यांना सन्मान पत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.ग्रामपंचायत मध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची संकल्पना राबविल्याने सगळीकडे देशभक्तीचे चैतन्य निर्माण झाले होते.एक आगळा वेगळा कार्यक्रम राबविल्याने सरपंच सौ सुनिता कासार, उप सरपंच श्री.किशोर सणस ,सर्व सदस्य,ग्रामसेवक श्री दीपक कदम तसेच ग्रामस्थांकडून सर्वांचे कौतुक करण्यात येत आहे.सौ. सुनिता बाळकृष्ण कासार सरपंच, ग्रामपंचायत मांडवे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













