नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायपाटण येथे स्वातंत्र्यदिनी भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न – आजचा महाराष्ट्र

रायपाटण येथे स्वातंत्र्यदिनी भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी(खेड)-श्री. वडचाई व्यायाम शाळा रायपाटण व कुवळेकर अकॅडमी पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने, वडचाई व्यायाम शाळेच्या पटांगणावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवदिनी भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. ३५ किलो वजनी गट विजेता जिजामाता रायपाटण ४५ किलो वजनी गट विजेता गांगणवाडी राय पाटण पुरुष खुला गट विजेता कुवळेकर अकॅडमी पाचल पुरुष खुला गट उपविजेता सरस्वती विद्यामंदिर पाचल महिलांचा प्रेक्षणीय सामना कुवळेकर अकॅडमी पाचल व खावडी लांजा यांच्यात झाला. यात कुवळेकर अकॅडमी पाचल विजयी झाली. विजेत्या खुला गट पुरुष संघाला आकर्षक चषक व धनवर्धिनी पतसंस्था रायपाटण यांच्याकडून ११११ रोख बक्षीस देण्यात आले.

उपविजेत्या संघाला रोख पाचशे रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेसाठी पंच म्हणून गायकवाड सर, संतोष गोसावी, दिलीप जाधव, दादासाहेब ठोंबरे, शरद वाशिंबे, अशोक मदगे, सुनील गवरे, गौतम पांगरीकर यांनी काम पाहिले

महिला विजेत्या संघाला अनिल आबा पाटणकर पुरस्कृत १००१ रुपये बक्षीस देण्यात आले. तसेच ३५ किलो व ४५ किलो वजनी गट विजेत्या संघांना रोख बक्षीसे देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेसाठी गावचे सरपंच महेंद्र गांगण, प्रदीप नेवरेकर, बांदरकर गुरुजी, उमेश पराडकर, मनोज गांगण, राजू चव्हाण, प्रदीप गांगण, संतोष कारेकर, विलास गांगण यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.स्पर्धेला रायपाटण व आजूबाजूच्या गावातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दामोदर लिंगायत, सत्यवान कुवळेकर, बाबा शेटे, बाळा नवरे, किशोर गुरव, मंगेश पराडकर, निमेश बांबरकर, महेश ताम्हणकर, महेश गांगण, दीपक मालप, अण्णा चापले, यश पराडकर, विजय कानडे यांनी विशेष मेहनत घेतली. अशा प्रकारे स्पर्धा खूप उत्साहात साजरी झाली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]