जि. प. शाळा तुळशी बु. ता. खेड जि. रत्नागिरी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

रत्नागिरी/खेड:- जि. प. शाळा तुळशी बु. प्रशाळेत आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ठिक ८.00वा निवृत्त कर्नल अधिकारी व तुळशी गावचे 
सुपूत्र श्री प्रकाश बाळकृष्ण चव्हाण यांचे हस्ते ध्वजारोहन करणेत आले. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दिलीप चव्हाण, उपाध्यक्षा सौ सोनाली सोनावणे, सदस्य श्री मोहन पाटणे, माजी अध्यक्ष श्री संतोष सुतार, ग्रामस्थ श्री सतिश सोनावणे, कृष्णा 
सुतार, सायली सुतार, अंगणवाडी सेविका चव्हाण ताई,शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनिल दळवीसर सहकारी सौ लोहार मॅडम, पेंडखलकर गुरूजी, नागरगोजेगुरूजी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. निवृत्त कर्नल अधिकारी श्री चव्हाण साहेब यांनी आपल्या संदेशपर भाषणात सांगितले की जवान सीमेवर देशाचे रक्षण करत असतो, 
देशांतर्गत विभागाचे रक्षण करणे ही आपली सामुहिक, नैतिक जबाबदारी आहे. आपण शिक्षण घेऊन मोठे झालो कि देश मोठा होतो. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली तरुण पिढी शिक्षित होऊन देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम झाली तरच देश खऱ्या अर्थाने विकसित होईल. यावेळी चव्हाण साहेब व त्यांच्या पत्नी यांनी सर्व विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री सुनिल दळवी सर यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













