नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रघुवीर घाटात परत दरड कोसळली,काही दिवसातील तिसरी घटना – आजचा महाराष्ट्र

रघुवीर घाटात परत दरड कोसळली,काही दिवसातील तिसरी घटना

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी/खेड : रघुवीर घाटात मोठी दरड कोसळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्हा आणि सातारा जिल्हा या दोन जिल्ह्यांना जोडणारा रघुवीर घाट हा खेडमध्ये येतो. याच घाटात मोठी दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील 20 गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. सातारा जिल्ह्यातील 20 गावांना संपर्कासाठी असणारा हा एकमेव रघुवीर घाट आहे विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसांतील ही तिसरी घटना आहे. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे असे वर्तवले होते . त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्मण होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]