नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचा ४ था वर्धापनदिन साजरा* – आजचा महाराष्ट्र

जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचा ४ था वर्धापनदिन साजरा*

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी/खेड:-रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील किंजले तर्फे नातू कलकराय वाडी मधीन नितीन सखाराम जाधव यांनी २०१७ मध्ये तालुक्यातील काही तरूणांना एकत्र करून जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेची स्थापना केली. जल फाउंडेशन कोकण विभाग या संस्थेचे फेब्रुवारी २०१८ मध्ये रजिस्ट्रेशन झाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नितिन सखाराम जाधव यांचा जन्म दिवस ०२ ऑगस्ट रोजी असल्याने हाच दिवस जल फाउंडेशन कोकण विभाग या संस्थेचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो.

 “पाणी म्हणजे जीवन” याच पाण्यासाठी तालुक्यातील काही गावात,डोंगर भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागते . पाणी समस्या कुठेतरी दूर व्हावी हीच नितीन जाधव यांची मुख्य संकल्पना होती.१ मे २०१९ रोजी संस्थेने चोरवणे जखमीची वाडी येथे पहिला उपक्रम राबविला या गावांतील पाणी समस्या कायमची दूर केली आहे.

तसेच किंजले तर्फे नातू कलकराय वाडीमध्ये डोंगरातुन पाणी गावात आणून तिथे पाण्याची साठवण करून या गावातील पाणी समस्या दूर केली आहे.

तसेच जल फाऊंडेशन च्या माध्यमातून आणि तालुक्यातील समाज बांधवांच्या माध्यमातून तीवरे धरणातील अपघात ग्रस्तांना वॉटर फिल्टर मशीन देण्यात आल्या.

२०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.तसेच भविष्यात जल फाऊंडेशन तर्फे अनेक उपक्रम राबवून तसेच पाणी समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत असे आवाहन यावेळी श्री नितीन जाधव यांनी केले .

२ ऑगस्ट २०२२ रोजी जल फाऊंडेशन चा ४ था वर्धापन दिन साजरा करण्यात आला तेव्हा जल फाउंडेशन कोकण विभाग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छोटे रोपटे भेट देऊन “झाडे लावा झाडे जगवा” हा संदेश देण्यात आला .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]