अंबरनाथ शहरामध्ये दिवसाढवळ्या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

ठाणे/अंबरनाथ :- अंबरनाथमध्ये आज दिवसढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी व्यावसायिकतेच्या वादातून गोळीबार झाल्याने अंबरनाथमधील शिवाजीनगर आज हादरले. अंबरनाथमध्ये (Ambarnath) दिवसढवळ्या गोळीबार (Firing) केला गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या हल्लात दोघां भावांवर हल्ला करण्यात आला असून जागीच एका भावाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर धारदार शस्राने वार (stab with a sharp weapon) करण्यात आल्याने गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर पोलिसांनी तात्काळ आळा घालावा अशा मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तिघांजणांकडून हा हल्ला करण्यात आला असून तुषार गुंजाळ यांचा यामध्ये मृत्यू झाला असून गणेश गुंजाळ हे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांचे गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर परिसरातील काही जणांबरोबर व्यावसायिक पातळीवर वाद होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













