नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उसर्लीकरांच्या आनंदावर फिरले पाणी! त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली बस सेवा एका दिवसात बंद… – आजचा महाराष्ट्र

उसर्लीकरांच्या आनंदावर फिरले पाणी! त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली बस सेवा एका दिवसात बंद…

पत्रकार अभिनव येवले

पनवेल : पनवेल रेल्वे स्थानक ते उसर्ली अशी नवीन बस सेवा दिनांक १२ जुलै २०२२ पासून सुरु करण्यात आली होती. परंतु मार्गात येणाऱ्या धोकादायक पुलामुळे ही बस सेवा एका दिवसातच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे उसर्ली हद्दीतील लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पनवेल ते उसर्लीला जोडणाऱ्या मार्गाच्या हद्दीत एक नदीचा पूल लागतो. आणि हा पूल अवजड वाहनांसाठी धोकादायक आहे असे शासनाने पूर्वीच जाहीर केले होते. तसे फलक ही लावण्याचे आदेश त्यांनी विचुंबे ग्रामपंचायत यांना दिले होते. परंतु याची कल्पना बस परिवहन मंडळाला नव्हती. त्यामुळे त्यांनी बस सेवा सुरू केली. बस सेवा सुरू झाल्याचे समजताच विचुंबे ग्रामपंचायतीने पुलाचे कारण देत त्वरित बस सेवा बंद करण्याचे परविहन मंडळ व शासनाला पत्र दिले. व बस सेवा बंद केली. 

 

उसर्ली मधील स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून उसर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल तांबे यांनी पाठपुरावा करून ही बस सेवा उसर्लीतील लोकांसाठी सुरू केली होती. त्यामुळे तेथील लोकांनी आनंद व्यक्त केला होता. तसेच स्थानिक लोकांनी सरपंच अतुल तांबे यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आभार ही मानले होते. शेअर रिक्षाला लोकांना दररोज येऊन जाऊन रु. ४०/- द्यावे मोजावे लागत आहेत. काही लोकांना रु. ४०/- दररोज परवडत नाही म्हणून ते पायी प्रवास करतात. त्यापेक्षा बसचे भाडे येऊन जाऊन फक्त रु. १४/- इतकेच होते. आणि लोकांच्या खिशाला ते परवडणारे होते. परंतु लोकांच्या पदरी निराशा पडली आहे. धोकादायक पुलामुळे बंद करण्यात आलेली बस सेवेमुळे लोकांना पुन्हा रिक्षाचाच पर्याय निवडावा लागणार आहे. शेवटी सरपंचांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाला यश मिळवून ही अपयश आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]