नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कु. आयान पाटील याच्या वाढदिवसानिमित्त गणपतीपुळ्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप! – आजचा महाराष्ट्र

कु. आयान पाटील याच्या वाढदिवसानिमित्त गणपतीपुळ्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप!

प्रतिनिधी

ठाणे / भिवंडी :- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि .२७  शिवसेना भिवंडी तालुका सचिव तथा माजी सरपंच श्री. सचिन पाटील यांचे सुपुत्र कु. आयान सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कु. आयान सचिन पाटील याच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला. तसेच सालाबादप्रमाणे यंदाही गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.
वाढदिवस केवळ उत्सव म्हणून साजरा न करता त्यानिमित्ताने गरजू व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणारा हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]