नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लोणाडच्या पुरातन शंकर मंदिर व खांडेश्वरी लेणीच्या संवर्धनासाठी १०० कोटींचा निधी द्या,देवा ग्रुप संघटनेची राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी! – आजचा महाराष्ट्र

लोणाडच्या पुरातन शंकर मंदिर व खांडेश्वरी लेणीच्या संवर्धनासाठी १०० कोटींचा निधी द्या,देवा ग्रुप संघटनेची राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी!

प्रतिनिधी

ठाणे / भिवंडी :- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि.२७   भिवंडी तालुक्यातील लोणाड येथील ऐतिहासिक व पुरातन शंकर मंदिर तसेच खांडेश्वरी लेणीचा वारसा जतन, संवर्धन व परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास करण्यासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी देवा ग्रुप संघटनेचे अध्यक्ष सुजित ढोले व सचिव तानाजी मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यासंदर्भात संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, ठाणे जिल्हाधिकारी तसेच राज्यपाल यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. लोणाड येथील शंकर मंदिर व खांडेश्वरी लेणी यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक व पुरातत्त्वीय महत्त्व असून, या वास्तूंचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन व जतन करणे काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.लोणाड परिसरातील या पुरातन वास्तू भिवंडी तालुक्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची महत्त्वपूर्ण ओळख आहेत. या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास धार्मिक तसेच ऐतिहासिक पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे शासनाने या परिसरासाठी स्वतंत्र पर्यटन विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.प्रस्तावित निधीतून मंदिर व लेणी परिसराची दुरुस्ती व संवर्धन, अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, विद्युत व्यवस्था, आकर्षक प्रकाशयोजना, वाहनतळ, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, माहिती केंद्र, दिशादर्शक फलक तसेच परिसर सुशोभीकरणाची कामे करण्यात यावीत, असेही निवेदनात म्हटले आहे.या ऐतिहासिक स्थळाचा नियोजनबद्ध पर्यटन विकास झाल्यास स्थानिक नागरिक, युवक, महिला बचतगट तसेच छोट्या व्यावसायिकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे केवळ मंदिर व लेणींचे संवर्धन न करता संपूर्ण परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने एकात्मिक विकास करण्याची आवश्यकता असल्याचे सुजित ढोले व तानाजी मोरे यांनी स्पष्ट केले.भिवंडी तालुक्याचा ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याबरोबरच लोणाडला महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून विकासकामांना सुरुवात करावी, अशी आग्रही मागणी देवा ग्रुप संघटनेचे अध्यक्ष सुजित ढोले व सचिव तानाजी मोरे यांनी केली आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]