प्रसिद्ध उद्योजक भानुदास भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन!
प्रतिनधी
ठाणे (भिवंडी ) :- (आ. मा. टॉ. टे. न्यू )दि.२३ भिवंडी तालुक्यातील मौजे वळगावचे सुपुत्र तथा प्रसिद्ध उद्योजक श्री. भानुदास (शेठ) मधुकर भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी विविध ठिकाणी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान शेठ ग्रुप, वळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमांत इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून, प्राथमिक शाळा वळ येथील विद्यार्थ्यांना पी.टी. ड्रेसचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडी शाळा वळ व कैलासनगर वळपाडा येथील विद्यार्थ्यांना पुस्तके, तर प्राथमिक शाळा कैलासनगर वळपाडा येथील विद्यार्थ्यांना टी-शर्टचे वाटप केले जाणार आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहनाळ व सारंगगाव येथील विद्यार्थ्यांनाही पी.टी.
ड्रेसचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय मुक्ताई भजन मंडळ, वळ यांना अन्नधान्याची भेट, तर ओम साई सेवा पदयात्रा मंडळ, वळ यांना साऊंड सिस्टिम भेट देण्यात येणार आहे.तसेचबालयोगी कैलास महाराज दत्त मंदिर मठास ३० खुर्च्या व १० टेबल भेट देण्यात येणार असून, चिंबिपाडा येथील शाळेसाठी आवश्यक साहित्य देण्यात येणार आहे. यासोबतच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, शेळूमाता ४०+ संघास बूट (शूज) वाटप करण्यात येणार आहे.
वाढदिवसाचा उत्सव केवळ औपचारिक न ठेवता शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपत विविध घटकांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम भगवान शेठ ग्रुपच्या वतीने राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक भगवान शेठ ग्रुप, वळ यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून केले आहे.प्रसिद्ध उद्योजक भानुदास भोईर यांना दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून तसेच संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांच्याकडून वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













