नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अँड.संतोष चव्हाण यांची ‘महानगर सफाई कर्मचारी संघा’च्या महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सल्लागारपदी नियुक्ती – आजचा महाराष्ट्र

अँड.संतोष चव्हाण यांची ‘महानगर सफाई कर्मचारी संघा’च्या महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सल्लागारपदी नियुक्ती

प्रतिनिधी
ठाणे ( भिवंडी ) :- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि.२३ कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने कायदेशीर लढा देणारे अँड.संतोष जानू चव्हाण यांची ‘महानगर सफाई कर्मचारी संघ’ या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष भारत लक्ष्मण गायकवाड यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही जबाबदारी अँड. चव्हाण यांच्यावर सोपविली आहे.कामगारांचे हक्क, त्यांच्या समस्या तसेच कामगार कायद्यांतर्गत मिळणारे संरक्षण यासाठी कायदेशीर मार्गदर्शन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आता अँड.चव्हाण पार पाडणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे सफाई कर्मचारी तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रश्नांना कायदेशीर व्यासपीठ मिळण्यास मदत होणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.‘कामगारांच्या न्यायासाठी कायदेशीर लढा अधिक प्रभावी करणार’नियुक्तीनंतर अँड.संतोष चव्हाण यांनी कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत, कामगार कायद्यांच्या चौकटीत राहून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कामगारांवर होणारा अन्याय, सेवासंबंधी अडचणी, हक्कांचे उल्लंघन तसेच विविध कायदेशीर प्रश्नांवर योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक ते कायदेशीर सहकार्य देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.संघटनेच्या माध्यमातून सफाई कर्मचारी आणि इतर कामगारांच्या प्रश्नांना संघटित स्वरूप देऊन शासन व संबंधित प्रशासनाकडे ते प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीनेही ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन अँड.संतोष चव्हाण यांच्या नियुक्तीबद्दल ‘महानगर सफाई कर्मचारी संघा’चे अध्यक्ष भारत लक्ष्मण गायकवाड, कार्याध्यक्ष महेश गायकवाड, उपाध्यक्ष महेश पाटील, संघटक कैलास शिंदे, कार्याध्यक्ष नवीन गवळी तसेच संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.कामगारांच्या हक्कांसाठी कायद्याच्या माध्यमातून सक्षम आवाज उभा करण्याची संधी मिळाल्याबद्दल अँड.चव्हाण यांनी संघटनेचे आभार मानले असून, सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]