नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वाडा नगरपंचायतीची अतिक्रमण हटाव मोहीम, – आजचा महाराष्ट्र

वाडा नगरपंचायतीची अतिक्रमण हटाव मोहीम,

प्रतिनिधी सत्यवान तरे

पालघर :- वाडा शहरातील मुख्य रस्ते व पदपथांवरील वाढत्या अतिक्रमणाविरोधात वाडा नगरपंचायतीने मोठी कारवाई सुरू केली आहे. शहरातील पदपथांवर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले होते. तसेच संध्याकाळच्या वेळी अनेक भाजीपाला व मच्छी विक्रेते थेट रस्त्यावर व्यवसाय करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली होती. परिणामी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.या समस्येची गंभीर दखल घेत वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी अतिक्रमणधारक व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले.सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करत असताना काही भाजीपाला व मच्छी विक्रेते घटनास्थळी धावून आले. यावेळी दोन महिलांनी जेसीबी चालकाला चापट, बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप नगरपंचायतीने केला आहे.या घटनेनंतर नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी वाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. संबंधित महिलांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणे यासह लागू असलेल्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होती.नगरपंचायतीने शहरातील रस्ते व पदपथ मोकळे करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान, अतिक्रमण कारवाईदरम्यान काही नागरिकांनी असा आरोप केला की, टपरीधारकांकडून कथितरीत्या चिरीमिरी घेऊन त्यांना संरक्षण देणारे काही लोकही कारवाईच्या वेळी रस्त्यावर उतरून विरोध करताना दिसले. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.विशेष म्हणजे, पालघर टाइम्सने वाडा शहरातील अतिक्रमणाच्या समस्येबाबत चित्री करण प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर नगरपंचायतीने तातडीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील पदपथ व रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सुरू झालेली ही मोहीम सातत्याने व निष्पक्षपणे राबवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]