शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज कल्याण न्यास तर्फे कोल्हापुरात विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप!
प्रतिनिधी
कोल्हापूर, दि. २७ (आ.मा.टॉ.टे.न्यू) : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज कल्याण न्यास, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉ. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दि.२७/७/२०२६ रोजी श्री ज्योतिर्लिंग विद्या मंदिर, वडणगे-निगवे 
दुमाला तसेच कुमार विद्यालय, निगवे दुमाला (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण न्यास, महाराष्ट्र राज्याचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. विश्वास पाटील (भुयेवाडी) होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बाबासो पाटील (माजी संचालक, राजाराम साखर कारखाना, बावडा), श्री. पांडुरंग कांबळे (चेअरमन, जयहिंद सोसायटी, निगवे), श्री. रमेश पाटील (माजी चेअरमन, जयहिंद सोसायटी, निगवे), श्री. नितीन चौगुले (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य) यांच्यासह शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. श्रीवास्तव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविकाने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. विश्वास पाटील यांनी समाज कल्याण न्यासाचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉ. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत संस्थेमार्फत राज्यभर राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्य, वह्या, गणवेश, शालेय बॅगा, बूट, छत्र्या यांचे वाटप, आदिवासी भगिनींना साड्यांचे वितरण, रक्तदान व आरोग्य शिबिरे, मॅरेथॉन स्पर्धा, भजन, निबंध, चित्रकला, शुद्धलेखन स्पर्धा तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धांसारखे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी श्री. बाबासो पाटील, श्री. पांडुरंग 
कांबळे आणि श्री. रमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करत समाज कल्याण न्यास ही संस्था करत असलेल्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. ए. पाटील यांनी केले, तर श्री. एस. डी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि समाजहिताचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













