नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून उल्लास,नवभारत साक्षरता वारी प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा…. – आजचा महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून उल्लास,नवभारत साक्षरता वारी प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा….

प्रतिनिधी

बारामती :- महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक धोरणानुसार,माननीय शिक्षण संचालक (योजना)श्री.कृष्णकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षण उप संचालक पुणे श्री.राजेश क्षीरसागर ,उपशिक्षण अधिकारी श्री.सचिन अनंत कवळस, उपशिक्षण अधिकारी भाऊसाहेब सरक, यांच्या नेतृत्वाखाली नवभारत ,उल्लास – साक्षरता वारी-२०२६- बारामती तालुक्यातील काठेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमार्फत आयोजित, उल्लास,नवभारत साक्षरता वारी प्रकल्पास महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.ना. सुनेत्राताई पवार यांनी भेट देऊन नवभारत साक्षरता वारी प्रकल्पास शुभेच्छा दिल्या.उल्लास,नवभारत साक्षरता वारी प्रकल्पाचे कौतुक करत या वारीमध्ये साक्षरता, नशामुक्ती, रस्ता वाहतूक सुरक्षा, याबाबत जनजागृती केली जात आहे.यावेळी विभागीय नोडल अधिकारी डॉ. मणिलाल रतीलाल शिंपी यांनी रस्ता सुरक्षा RSP अधिकारी शिक्षक युनिट मार्फत पालकांमध्ये वाहतूक सुरक्षा ,वाहतुकीचे नियम पाळणे,अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांमार्फत ट्रॅफिक सेन्स निर्माण होणे आवश्यक आहे याची थोडक्यात सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.ना. सुनेत्राताई पवार यांनी RSP अधिकारी शिक्षक युनिट च्या कार्याचेही कौतुक करून अभिनंदन केले.RSP अधिकारी युनिट मार्फत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक नियमांचे पालन करणे, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी समाजामध्ये रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांनी सांगितले.यावेळी केंद्रप्रमुख अजित नांगरे,जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी उपस्थित होते.उपसंचालक श्री. राजेश क्षीरसागर यांनी साक्षरता वारी प्रकल्पाचे महत्व सर्वत्र समजण्यासाठी नियोजन व विविध घटकांबद्दल मार्गदर्शन केले. यूट्यूबर ,स्वयंसेवक श्री. राजेंद्र जगे, ह. भ. प.श्री.गणेश महाराज भगत, जोशी महाराज, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान ,विभागीय नोडल अधिकारी डॉ.मणिलाल शिंपी RSP अधिकारी शिक्षक श्री.संजय खैरनार उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]