नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ठाण्यात आरएसपी अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप पोलीस उपायुक्त श्री. पंकज शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न! – आजचा महाराष्ट्र

ठाण्यात आरएसपी अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप पोलीस उपायुक्त श्री. पंकज शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न!

प्रतिनिधी

ठाणे :- दि.२२( आ. मा. टॉ. टे. न्यू )महाराष्ट्र पोलीस विभाग व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ठाणे विभागात रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रभावी प्रचार व प्रसार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आरएसपी अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त श्री. पंकज शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली हा समारोप सोहळा वाहतूक नियंत्रण कक्ष, तीन हात नाका, एलबीएस मार्ग, ठाणे (पश्चिम) येथे संपन्न झाला.या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तसेच ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी देवीदास महाजन व जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. विभागीय समन्वय अधिकारी डॉ. मनिलाल रतीलाल शिंपी आणि नोडल ऑफिसर श्री. दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले.समारोप कार्यक्रमात डॉ. मनिलाल शिंपी यांनी प्रास्ताविकातून ‘रस्ता सुरक्षा व नागरी संरक्षण’ या विषयाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांमध्ये ट्रॅफिक सेन्स निर्माण करण्याची गरज स्पष्ट केली. रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा प्रसिद्धी प्रमुख आरएसपी डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील,समाजसेवक माणिक पाटील, नोडल ऑफिसर तथा विभागीय समादेशक डॉ.श्री.मनीलाल रतिलाल शिंपी,नोडल ऑफिसर दिलीप स्वामी,जिल्हा समादेशक जितेंद्र सोनवणे,सुभाष गायकवाड (समादेशक कल्याण पूर्व) बाळा साठे (समादेशक ठाणे शहर)निलेश नरवडे (समादेशक भिवंडी शहर) आदी मान्यवर व मोठ्या संख्येने आर एस पी अधिकारी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने आरएसपी अधिकारी व शिक्षक वर्गाने सहभाग घेतला.यावेळी प्रशिक्षणार्थी चित्रकला शिक्षकांनी पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट व इतर मान्यवरांचे सुंदर रेखाचित्र तयार करून त्यांना स्मृतिचिन्ह म्हणून भेट दिली, ज्याने कार्यक्रमात विशेष रंगत आली.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “मी देखील एका शिक्षकामुळेच इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजवून देशाची भावी पिढी घडवावी. वाहतुकीचे नियम प्रत्येकाने आपल्या घरापासून पाळण्यास सुरुवात केली, तर देशाची प्रगती निश्चित होईल,” असे त्यांनी सांगितले.प्रशिक्षण अधिक परिणामकारक व्हावे यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धानवे व ऑफिस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर चाबुकसर मेजर यांनी प्रात्यक्षिकांसह सखोल माहिती देण्याची उत्कृष्ट व्यवस्था केली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]