नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याणची दमदार कामगिरी – आजचा महाराष्ट्र

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याणची दमदार कामगिरी

प्रतिनिधी

तब्बल ४३७.८० कोटींची विक्रमी महसुल !

ठाणे :- दि.९ ( आ.मा.टॉ.टे.न्यू ) उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ४३७ कोटी ८० लाख रूपयांचा विक्रमी महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.विशेष म्हणजे, शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा १०० टक्क्यांहून अधिक महसूल वसुली करण्यात कार्यालयाला यश आले आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्री. आशुतोष बारकुल यांनी दिली आहे.उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांना प्राप्त महसूलामध्ये सर्वाधिक हिस्सा वाहन नोंदणी मधून मिळाला आहे. वर्षभरात एकूण १,०८,१२५ वाहनांची नोंदणी करण्यात आली. या मध्ये दुचाकी ७९,५५७, चारचाकी १६,८२६ ऑटोरिक्षा ३,५७१ मालवाहू वाहने ४,२९२ तसेच प्रवासी वाहने व इतर वाहने यांचा समावेश आहे.मागील वर्षाच्या ३७२ कोटी २२ लाखांच्या महसूलाच्या तुलनेत यंदा लक्षणीय तब्बल ४३७ कोटी ८० लाख रूपयांची वाढ नोंदविण्यात आली असून, ही कामगिरी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या समन्वयपूर्ण आणि मेहनती प्रयत्नांचे फलित असून या यशामुळे कार्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]