रायगड जिल्ह्यातील शेतकरीवर्गाचा विकास होणार–प्रा.डॉ.जयपाल पाटील
प्रतिनिधी
रायगड (अलिबाग) :- (आ.मा.टॉ.टे.न्यू) रायगड जिल्हा परिषदेची बैठक संपन्न होऊन अनुभवी भाजप पेणचे युवानेते वैकुंठ पाटील यांच्याकडे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापतीपद देण्यात आले. त्या मुळे रायगडातील शेतकरीवर्गाचा विकास निश्चित होणार असे मत छत्रपती शिवाजीमहाराज लोक विद्यापीठ 
अमरावतीचे संचालक व जिल्हा परिषदचे कृषीनिष्ठ”पुरस्कार विजेते प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले.शेतकरीवर्गा साठी केंद्र व महाराष्ट्र सरकार च्या विविध योजना आणी रायगड जिल्हा परिषदेच्या विविध योजना त्वरेने मिळुन शेतकऱ्याच्या राहिलेल्या जमिनीवर योजना देण्याचे कार्य करतील कारण ते शेतकरी आहेत व जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी यापुर्वी काम केले असल्याने अधिकारी त्यांना बघु,पाहु सांगुन शेतकरीची टाळाटाळ होणार नाही,कृषी सोबत पशुसंवर्धन खाते आल्याने केंद्र सरकार च्या गोशाळा च्या अनुदानावर दुध वाढेल आणी यांचाही शेतकरीवर्गाची अथिँक उन्नती होईल याकडे ते लक्ष देतील, श्री.वैकुंठ पाटील यांना समाजसेवेचा अनुभव घरातून मिळाला आहे कारण त्याचे वडील समाजसेवेतुन राजकारणात येऊन महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळात व विद्यमान आमदार आहेत, विषेश म्हणजे कायम त्याचा चेहरा हसरा असतो मात्र जनतेचे कार्य करताना अधिकारींवर कायद्यावर लक्ष ठेवतात. त्यानां सभापती पद मिळाले म्हणून त्याचे हार्दिक अभिनंदन,रायगडातील शेतकरीवर्गाचा विकास जोमाने होणार यासाठी शेतकरी वर्गातफें, प्रगतिशील शेतकरी म्हणून प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













