नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अजित दादांची सावली आता बारामतीची माऊली दादांच्या स्वप्नांची मशाल आता सुनेत्रा वहिनींच्या हाती – आजचा महाराष्ट्र

अजित दादांची सावली आता बारामतीची माऊली दादांच्या स्वप्नांची मशाल आता सुनेत्रा वहिनींच्या हाती

प्रतिनिधी

बारामती – “ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य शेतकऱ्यांच्यासाठी आणि बारामतीच्या विकासासाठी झोकून दिलं, त्या अजितदादांची उणीव आज पावलापावलावर भासत आहे. मात्र, दादांनी पाहिलेली स्वप्नं आणि त्यांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी दादांची सावली आणि आता बारामतीची ‘माऊली’ सुनेत्रा वहिनी खंबीरपणे उभ्या आहेत,” अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित सभेत बावनकुळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, नरहरी झिरवाळ, छगन भुजबळ खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि महायुतीचे इतर मान्यवर नेते उपस्थित होते.बावनकुळे म्हणाले की, “आजचा दिवस ऐतिहासिक आहे, पण तितकाच मनावर दडपण आणणाराही आहे. महाराष्ट्राचे लोकनेते आणि ‘विकास पुरुष’ अजितदादा आज आपल्यात नाहीत, ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. गडचिरोलीपासून अमरावतीपर्यंत असा एकही कानाकोपरा नाही जिथे दादांच्या कार्याचा ठसा नाही. शेतकऱ्याच्या शेतात पोहोचलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा अजितदादांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहे.” यावेळी बावनकुळें यांनी ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी जागविल्या. कॉग्रेसने ही निवडणूक लढू नये असे आवाहन त्यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]