अलिबागला सांबरी येथे सर्वा साठी निसर्ग सहल
प्रतिनिधी
रायगड (अलिबाग ) :-आ.म.टॅा.टे.न्यू नेहमीच्या जीवनात कुटुंबापासून दुर निसर्गरम्य वातावरणात मित्र परिवारात आपल्या कॉलेज, नोकरी अथवा ऊद्योग धंद्यापासुन दुर कोकणातील जंगलातील शेतघरात राहण्याचा अनुभव निवृत्त कर्मचारी,लेखक, कवी यांनी कधी न अनुभवलेले निसर्ग रम्य ठिकाणाचा आस्वाद घेण्यासाठी मुंबई,ठाणे,पनवेल, पेण,पेझारी मार्गावरून सांबरी-कुर्डुस ,पुणे,कोलाड,नागोठणे मार्गावरून सांबरी-कुर्डुस, 3 तास अंतरावर सर्व सुखसोई युक्त शनिवार दिनांक 25 व रविवार 26 एप्रील 2026 ला जेष्ठ पत्रकार प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी आयोजित केली आहे.यासाठी एका सहलीचा खर्च प्रत्त्येकी 1500/-रुपये आहे.
यामधे आपल्या वाहनाने, पोयनाड व नागोठणे येथुन एस.टी. रिक्षाने सकाळी 10 वाजेपर्यंत वृध्दाश्रम, महादुनगर सांबरी येथे यावे. येताच,चहा,नाश्ता त्यानंतर काजु
बागेत झाडांचा परिचय कृषीमित्राची व आयुर्वेदिक तज्ञाची भेट, 2 वाजता शाकाहारी पोटभर जेवण, दुपारी आराम, 4.30 वाजता केळीच्या बागेत, बैठकीत आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, सांयकाळी 7 वाजता मनोरंजन कार्यक्रम 9 वाजता शाकाहारी पोटभर भोजन, आराम रविवार सकाळी 6.30 ते 7.30 योगा , सकाळी 10वाजता गवती कोरा चहा, नाश्ता 11.30 वाजता जंगलातील सफर, जीवनातील कथाकथन,दुपारी 2 वा चिकन/मासे कटले पोटभर जेवण देण्यात येईल,ताटात जेवण टाकले तर 100रुपये दंड आकारण्यात येईल. यानंतर 4.30 ते 5 वाजता समारोप करण्यात येईल. यासाठी फक्त रुपये 1500/-रुपये आकारण्यात येणार आहेत.बुकिंग अँडव्हास गुगल पेने करावी,येथे आपणास पाहिजे असेल तर अलिबागमधील मांसाहाराचा आंनद घेणे असल्यास पोपटी750 किलो, भाजलेली कोंबडी 250 प्लेट, गावठी कोंबडी 350 प्लेट, जिताडा 350/-तळुन, कटले कालवण 250रुपये, 200तळलेले,पाव किलो वजरी 250/ रक्ती 200/चिकन, पेठा, कलेजी250/ रुपये , बोकड भेजा रस्सा 250,चिबोरी रस्सा, सुप 250रुपये , जिताडा,मटण 350/रुपये,बोकड कलेजी 350 रुपये,सुकी मच्छी वेफर 100 प्लेट, सुकट चटणी, कोळंबी 350रुपये,शाकाहारी सलाद 100रुपये येथे उपलब्ध आहे.आपणास हवी असेल तसेच जिताडा, चिंबोरी,रावस,कोळंबी,बोकडाचे मटण,स्पेशल रक्ती,कलेजी,याचे वेगळे पैसै भरून उपलब्ध करण्यात येईल, घरी जातानां येथील मधाळ केळी, जंगलातील मध,काजु,आंबे,कैरी, तलावातील कटले,रुई,जिताडे, मासे,अल्कालाईन वाॅटर,आपणास हवे असल्यास विकत घेता येतील. यासाठी,नव्या मित्रांची भेट जंगल सफारीचा ,मनसोक्त आंनद,भरपूर प्राणवायुची लयलूट आता पर्यंत ठाणे,मुंबई ,पुणे येथील महिला,पुरुषांनी आनंद घेतला आहे. जंगल सफारीचाआंनद घेताना नातेवाईकांशी संपर्कासाठी ईटरंनेट 24तास सुविधा आहे.आतापर्यंत 200 जणांनी भेट देऊन गेले.कालच्या सहलीत आटपाटी सांगली, पुणे,ठाणेचे रसिक नागरिक सहभागी झाले होते.आपणही यावे.सध्या निवास व्यवस्था 50जणांची आहे.लवकरच वृध्दाश्रम सुरु करीत आहोत. आमच्या वात्सल्य वृध्दाश्रम येथे शालेय सहल साठी विद्यार्थ्यांना पोटभर शाकाहारी भोजन फक्त 100/- निवास रुपये 50/रुपये,चहा नाश्ता रुपये 50/-फक्त आकारण्यात येतात. यासाठी कृषी पर्यटन, मालक श्री.संतोष पाटील मो. 98206 00857, निसर्ग सहल मो.संपर्क9270446777/9673727277 वर संपर्क साधावा.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













