कल्याण येथे सुतार कौशल्य विकास कार्यक्रमाचा समारोप; ३५० लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, इन्स्ट्रुमेंट्स व सेफ्टी किट वाटप!
प्रतिनिधी
ठाणे ( कल्याण ) :- आ.म.टॅा.टे.न्यू डी . वाय. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने आमने–लोणाड विभागातील सुतार कारागिरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सुतार कौशल्य विकास कार्यक्रमाचा समारोप सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कल्याण (पश्चिम) येथील आचार्य आत्रे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३५० लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती तसेच सेफ्टी किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सुतार कामगार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सुमारे २२० लाभार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहून आपले प्रमाणपत्र, इन्स्ट्रुमेंट्स व सेफ्टी किट स्वीकारले. कार्यक्रमात लाभार्थ्यांमध्ये
उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे युवा प्रदेशाध्यक्ष श्री. विरेन दयानंद चोरघे, इबको कंपनीचे संचालक श्री. सच्चिदानंद मिश्रा, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील, भाजपा सरचिटणीस श्री. तुकाराम बजागे, रस्ता सुरक्षा समन्वयक आरएसपी श्री. मनिलाल रतीलाल शिंपी, डी. वाय. फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. योगेश पाटील, सल्लागार ह.भ. प. प्रकाश केणे, सल्लागार ह. भ.प.नवनाथ सुतार तसेच महिला ठाणे जिल्हाध्यक्षा सौ. चारूशिला गायकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.यावेळी इबको कंपनीचे संचालक श्री. सच्चिदानंद मिश्रा, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील आणि भाजपा सरचिटणीस श्री. तुकाराम बजागे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढवले.डी. वाय. फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष श्री. दयानंद मोतीराम चोरघे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













