नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री हनुमान व मरीमाता मंदिर जिर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात – आजचा महाराष्ट्र

श्री हनुमान व मरीमाता मंदिर जिर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात

प्रतिनिधी महेश स्वामी जंगम 

रायगड (पाली कुंभारशेत) :- आ.म.टॅा.टे.न्यू कुंभारशेत येथील श्री महाबली हनुमान व मरीमाता मंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा १ व २ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. ग्रामस्थ मंडळाच्या पुढाकारातून हा दोन दिवसीय धार्मिक सोहळा पार पडणार असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.बुधवारी (१ एप्रिल) सकाळी

मांडव स्थापना व ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर मुर्तीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येणार असून गणेश पूजन, नवग्रह पूजन, संकल्प, विविध धार्मिक विधी पार पडतील. दुपारी मुर्ती अभिषेक व सायंकाळी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ह.भ.प. निलेश महाराज पवार यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर जागरण भजन सादर करण्यात येईल.गुरुवारी (२ एप्रिल) सकाळी मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यावेळी हनुमान जन्मोत्सव, कळशारोहण, पूर्णाहुती व महाआरती असे कार्यक्रम होणार आहेत. दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात येईल.या सोहळ्यात कीर्तन, भजन, हरिपाठ तसेच दशावतार नाटक यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रमही रंगणार आहेत. ग्रामस्थांनी सर्व भाविकांना उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]