नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *एक तारा निखळला दिपक नावाचा प्रशासन थंडावल ! – आजचा महाराष्ट्र

*एक तारा निखळला दिपक नावाचा प्रशासन थंडावल !

प्रतिनिधी समीर बामुगडे 

रायगड ( रोहा ) :- (आ.म.टॅा.टे.न्यू )रोहा तालुक्याच्या प्रशासनाला दिशा देणारा, जनतेच्या मनात विश्वासाचा दिवा पेटवणारा एक दीपक आज कायमचा विझला… माजी ग्रामसेवक दीपक दाजी चिपळूणकर (वय 60, रा. निवि) यांचे २६ मार्च रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने प्रशासनाचा कणा तुटला असून संपूर्ण तालुका शोकसागरात बुडाला आहे.धाटावसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये त्यांनी सेवा बजावताना केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर जनतेचा माणूस म्हणून काम केलं. त्यांच्या निर्णयात प्रामाणिकपणा, कामात पारदर्शकता आणि स्वभावात माणुसकी होती. त्यामुळेच ते साहेब कमी आणि आपले जास्त वाटायचे. जिथे प्रशासन अडखळतं, तिथे ते उभे राहत जिथे समस्या उभी राहायची, तिथे तोडगा घेऊन येणारा हा खंबीर आधार होता.त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विस्तार अधिकारी पदाची बढती मिळाली, पण पद उंचावलं तरी पाय मात्र जमिनीवरच राहिले. वृक्षप्रेम ही त्यांची ओळख नव्हे, तर त्यांचा श्वास होता. त्यांनी लावलेली झाडं आजही त्यांच्या आठवणींनी सळसळत उभी आहेत. अक्षय लॉनचा हिरवागार साज म्हणजे त्यांच्या जिवंत विचारांचंच प्रतिबिंब आहे.गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी लढत होते. स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा आणि अध्यात्मिक वृत्तीने त्यांनी ही झुंज दिली. पण अखेर रामनवमीच्या पवित्र दिवशी हा दीपक अनंतात विलीन झाला… मागे राहिला तो फक्त आठवणींचा उजेड आणि रिकामं झालेलं प्रशासन.त्यांच्या पश्चात पत्नी दीपिका ताई, एक मुलगा ओम चिपळूणकर मुलगी रिध्दी चिपळूणकर असा परिवार आहे. दशक्रिया ४ एप्रिल रोजी उद्धर पाली येथे, तर उत्तरकार्य ७ एप्रिल रोजी निवि येथे होणार आहे.एक दीपक विझला… पण त्याने दिलेला प्रकाश आयुष्यभर मार्ग दाखवत राहील.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]