आगरी समाजाचा अभिमान संपादक डॉ. किशोर पाटील यांना ‘बाळशास्त्री जांभेकर प्रेरणा पत्रकार भूषण पुरस्कार – २०२६’प्रदान!
निर्भीड लेखणीला मानाचा तुरा:: तीन दशकांची समाजाभिमुख पत्रकारिता गौरवली
रायगड (रोहा) :- सत्य, न्याय आणि लोकहितासाठी निर्भीडपणे आवाज उठवणारे ज्येष्ठ पत्रकार तसेच ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा बाळशास्त्री जांभेकर प्रेरणा पत्रकार भूषण पुरस्कार – २०२६’ प्रदान करून सन्मानाने रायगड जिल्ह्यातील रोहा येथे गौरविण्यात आले.साप्ताहिक “आजचा महाराष्ट्र” आणि टॉप टेन न्यूज – न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेल यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी 
रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा नगर परिषद रोहा येथील आयोजित विशेष कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात निस्वार्थ, निष्ठावान आणि समाजाभिमुख कार्य करत अनेक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या डॉ.श्री.किशोर पाटील यांच्या कार्याचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला. आगरी समाजातून महाराष्ट्रातील एकमेव मराठी दैनिकाचे संपादक म्हणून मागील १८ वर्षे त्यांनी प्रभावी नेतृत्व करत पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण केली आहे.पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या आदर्श विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सत्यनिष्ठ, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे साप्ताहिक “आजचा महाराष्ट्र” आणि टॉप टेन न्यूज – न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेल यांनी आयोजीत कार्यक्रमात सांगितले.
१)३० वर्षांच्या निस्वार्थ पत्रकारितेचा सन्मान..
२)आगरी समाजातील अग्रगण्य पत्रकाराचा गौरव..
३)समाजहितासाठी निर्भीड लेखणीची दखल..
४)‘आजचा महाराष्ट्र’ व ‘टॉप टेन न्यूज’च्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार
या प्रसंगी साप्ताहिक “आजचा महाराष्ट्र” व टॉप टेन न्यूजचे संपादक श्री. प्रशांत गणपत मोरे, रस्ता सुरक्षा अभियान विभागीय नोडल ऑफिसर (आरएसपी )डॉ.श्री.मनीलाल रतिलाल शिंपी,जेष्ठ पत्रकार अलिबाग डॉ.श्री. जयपाल पाटील,जेष्ठ पत्रकार भिवंडी अँड.संतोष चव्हाण,जेष्ठ पत्रकार भिवंडी श्री.अफसर खान, मेडिटेशन सेंटर संचालिका ब्रह्मकुमारी वैशाली दीदी,ह.भ.प.अँड. आकाश महाराज भोंडवे, महेश स्वामी जंगम, संजय लोटणकर, व आदी मान्यवरांच्या शुभहस्ते शाल,पुष्पगुच्छ,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यातच आला. कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













